रसमलाई
१. तयार केलेले १५ रसगुल्ले
२. १.२५ लिटर उत्तम दुध
३. ४ टेबलस्पून साखर
४. ७,९ पिस्त्यांचे काप
कृती
रसगुल्ले तयार झाल्यावर कोमट असताना दोन हातांच्या तळव्यात दाबून चपटे करून घ्यावे. दुध मोठ्या गॅसवर पसरट भांड्यात आटवायला ठेवावे. सतत हलवावे .निम्मे झाले की ३ टेबलस्पून साखर घालावी. साखर विरघळली. की गॅस बंद करावा. वरील दुध चांगले थंड झाले की त्यात चपटे रसगुल्ले टाकावेत व थंड करून पिस्ते घालून वाढावे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा