आलू टिक्की
कृती : – सर्वप्रथम बटाटे उकडून घेणे नंतर ते सोलून कुस्करून घ्यावेत. नंतर ब्रेडचे तुकडे बारीक करून कुस्करलेल्या बटाट्यांमध्ये मिसळून घ्यावेत. कांदा, कोथिंबीर, मिरच्या, पुदीना, अनारदाना, जिरे हे सगळे मिक्सरमधून ग्राइंड करून घ्यावेत. ग्राइंड केलेले हे सर्व मिश्रण कुस्करलेल्या बटाट्यामध्ये मिसळून एकजीव करून घ्यावे. त्यातच मीठ, तिखट घालावे व छोट्या चपट्या गोल टिक्क्या बनवाव्या.
ब्रेडक्रम्समध्ये घोळून तळाव्या बदामीसर रंगावर तळून घ्याव्या आपण एखादा रंग मिसळू शकता जेणेकरून चविष्ट आणि रूचकर टिक्की सोबत एक वेगळ्या रंगाची लज्जत त्याला येईल. सॉसबरोबर गरमागरम आलू टिक्की सर्व्ह करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा