मेथी दुधी मसाला
कृती: प्रथम मेथीची पाने खुडून घ्यावीत. धुवून चिरावीत. दुधी भोपळ्याची साले काढून घ्यावीत. त्याच्या आवडीप्रमाणे फोडी कराव्यात. फोडी कुकरमध्ये चाळणीत ठेवून वाफवून घ्याव्यात. कांदे उभे चीहून घ्यावेत. टोमाटो बारीक चिरावेत. लसून सोलावी. आले साले काढून घ्यावे. पातेल्यात दोन चमचे तेल तापवावे. तेलात कांदा टाकावा.तो परतल्यावर त्यात लसून, आले चिरून टाकावे. टोमाटो घालावा. तेल सुटेपर्यंत परतावे. डिशमध्ये गार करायला ठेवावे. परत पातेल्यात चार चमचे तेल तापत ठेवावे. चिरलेली मेथी तेलावर परतावी. मेथी चागली परतल्यावर हळद ,तिखट घालावे. परतलेले कांदे,लसून,आले, टोमाटो बारीक वाटून घ्यावे. परतलेल्या मेथीमध्ये वाटप घालावे. क्रीम,दही,गरम मसाला घालावा. चवीनुसार मीठ घालावे. मिश्रण परतावे. वाफवलेला दुधी भोपळा मिसळावा. तेल सुटेपर्यंत भाजी परतावी. पोळीबरोबर गरमागरम वाढावी.
टीप: दुधी भोपळा न खाणारी मुलेही आवडीने खातात.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा