परिवर्तन मोहिमेत सर्वांनीच सहभागी व्हावे

=रा. स्व. संघाच्या प्रतिनिधी सभेला बंगळुरू येथे प्रारंभ=
बंगलोर, (७ मार्च) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला आजपासून येथे प्रारंभ झाला. देशात परिवर्तनाची लाट आहे. प्रत्येकांनाच परिवर्तन हवे असल्याने परिवर्तनाच्या या लाटेत प्रत्येकच नागरिकाने सहभागी व्हायला हवे. भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी हे सक्षम नेते आहेत. गुजरातमध्ये त्यांनी जे परिवर्तन करून दाखविले, त्याचीच पुनरावृत्ती देशात करण्याची क्षमता त्यांच्यात आहे, असे रा. स्व. संघाने आज स्पष्ट केले.
‘‘नरेंद्र मोदी यांनी आपल्या आयुष्याची सुरुवातच रा. स्व. संघाचे स्वयंसेवक म्हणून केली. त्यांच्याविषयी आम्हाला गर्व वाटतो. देशाला आज बदल हवा आहे. मोदी यांनी गुजरातमध्ये आपली क्षमता सिद्ध केली आहे. ते अतिशय सक्षम नेते आहेत आणि देशातही ते जनतेच्या अपेक्षेनुसार बदल घडवून आणतील, असा आम्हाला विश्‍वास आहे,’’ असे रा. स्व. संघाचे सहसरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी अ. भा. प्रतिनिधी सभेच्या उद्‌घाटनानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
आमच्या बैठकीत राम मंदिर हा विषयच नाही. देशाला भेडसावित असलेल्या अन्य मुद्यांप्रमाणेच राम मंदिर हादेखील संघाकरिता एक मुद्दा आहे. राम मंदिरावरील आमच्या ठरावाची अंमलबजावणी कोणतेही सरकार करू शकत नसल्याने त्यावर प्रतिनिधी सभेत अजिबात चर्चा करण्यात येणार नाही. आम्ही केवळ महागाई, सुरक्षा आणि देशाचा अभिमान यावरच चर्चा करणार आहोत. याशिवाय, अल्पसंख्यकांचे राजकारण हादेखील आमच्या चर्चेतील मुख्य मुद्दा राहणार आहे, असे होसबळे म्हणाले.
केंद्रातील विद्यमान संपुआ सरकार अल्पसंख्यकांच्या नावाखाली समाजाचे विभाजन करीत आहे. जातीय व लक्ष्यित हिंसाचारविरोधी विधेयक, सच्चर आयोगाचा अहवाल हा त्यातलाच एक प्रकार आहे. आता हे सरकार समान संधी आयोग स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे. एका विशिष्ट धार्मिक अल्पसंख्यक समाजाला समान संधी देण्याकरिता हा आयोग आहे, अशी टीका करताना होसबळे म्हणाले की, केवळ एकाच विशिष्ट समाजाला नव्हे, तर देशातील प्रत्येकांनाच समान सधी मिळायला हवी, असे आमचे स्पष्ट मत आहे.
आम आदमी पार्टीकडे रा. स्व. संघ कसे पाहात आहे, असे विचारले असता, ते म्हणाले की, नवा पक्ष उदयास येणे ही आमची समस्या नाही. सरकार चालविण्याचा अनुभव किती आहे, हे विचारात घेतले जाते. दिल्लीतील ४९ दिवसांचा गोंधळ लोकांनी पाहिला आहे. ते लक्षात ठेवूनच लोक आपला निर्णय घेणार आहेत. लोक सज्ञान आहे. आम आदमी पार्टीचे सरकार त्यांच्यासाठी एक धडाच राहणार आहे. अन्य एका प्रश्‍नाच्या उत्तरात, ‘वय झालेल्या नेत्यांनी राजकारणातून संन्यास घ्यायला हवा, असे रा. स्व. संघाने कधीच म्हटले नाही. याबाबत त्यांना स्वत:च निर्णय घ्यायचा आहे. नव्या पिढीला संधी मिळायला हवी, असे आमचेही मत आहे. संधी ही केवळ राजकारणातूनच मिळत नसते. ती आयुष्याच्या सर्वच स्तरावरून मिळायला हवी. अगदी घरातून तर पंतप्रधान स्तरापयर्र्त संधी मिळायला हवी,’ असे त्यांनी स्पष्ट केले.
भाजपाने कुणाला तिकीट द्यावे, यात रा. स्व. संघाने आजवर कधीही हस्तक्षेप केलेला नाही. भाजपा एक अनुभवी पक्ष आहे. ते आपला निर्णय स्वत:च घेऊ शकतात, असेही होसबळे यांनी सांगितले. लोकसभा निवडणुकीत शंभर टक्के मतदान व्हायला हवे. देशहित सर्वतोपरी ठेवून प्रत्येकच नागरिकाने आपला मतदानाचा हक्क पार पाडायला हवा. यासाठी आम्ही कार्य करणार आहोत, असेह ते म्हणाले.

✎ Edit

Posted by - Admin,
on - शनिवार, ८ मार्च, २०१४,
Filed under - ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS