‘शामिताभ’ची पहिल्या दिवशीच कमाई साडेतीन कोटींची
मुंबई, [८ फेब्रुवारी] – बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांचा ‘शामिताभ’ चित्रपट काल चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर पहिल्याच दिवशी तब्बल ३.५० कोटी रुपयांची कमाई केली आहे.
महानायक अमिताभ बच्चन, तामिळ सुपरस्टार धनुष आणि अक्षरा हसन यांचा ‘शामिताभ’ हा चित्रपट ६ फेबु्रवारीला चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. दिग्दर्शक आर. बल्की यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटाने मुंबईत पहिल्या दिवशी १.२५ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. तर दिल्ली आणि उत्तर प्रदेश मिळून ६० लाख रुपयांची कमाई केली. पूर्व पंजाबमध्ये ३० लाख तर म्हैसूरमध्ये ३५ लाख रुपयांची कमाई या चित्रपटाने केली आहे. आठवड्याभरात हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगला गल्ला जमवेल असे सांगण्यात आले आहे.

on - मंगळवार, १० फेब्रुवारी, २०१५,
Filed under - कला भारती , ठळक बातम्या
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा