श्रेया घोषाल अडकली विवाहबंधनात

मुंबई, [६ फेब्रुवारी] – गायिका श्रेया घोषाल तिच्या बालपणीचा मित्र शिलादित्यसोबत विवाहबंधनात अडकली आहे. मुख्य म्हणजे हा विवाहसोहळा अत्यंत गुप्त पद्धतीनं पार पडला आहे. अशी माहिती श्रेयाने ट्विटरवरून दिली आहे.
हिपकॅस्क कॉमचा सर्वेसर्वा आणि अनेक वर्षांपासून प्रियकर असलेल्या शिलादित्यशी बंगाली पद्धतीने श्रेयाने लग्न केले आहे. मागील वर्षी शिलादित्यने श्रेयाला लग्नाची मागणी घातली होती आणि श्रेयाने लगेच लग्नासाठी होकार दिला होता.
काल ट्विटरवरून श्रेयाने आपल्या लग्नाचे संकेत दिले होते, त्यानंतर आज तिने विवाहाची माहिती दिली आहे. कुटुंबिय आणि अगदी जवळच्या मोजक्या मित्रमंडळीच्या उपस्थितीत तिने विवाह केला आहे.

on - सोमवार, ९ फेब्रुवारी, २०१५,
Filed under - कला भारती , ठळक बातम्या
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा