सनी देओलच्या घायलचा सीक्वेल येणार

मुंबई, [२६ जून] – १९९० साली तुफान हिट ठरलेल्या घायल चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. या चित्रपटातही सनी देओल आणि मिनाक्षी शेषाद्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटाकडून सनी देओलला भरपूर अपेक्षा आहे.
दोन वर्षापूर्वी सनी देओलचा ‘सिंग साब द ग्रेट’ हा चित्रपट तिकीट खिडकीवर विशेष कमाई करू शकला नाही. त्यामुळे घायलच्या सीक्वेल कडून सनीला खूप अपेक्षा आहेत. यावेळी सनीने सांगितले की, ‘‘सध्या सीक्वेल युग सुरू असून अनेक जुन्या चित्रपटाचे रिमेक बनविण्यात आले आहे. तब्बल २५ वर्षांनंतर घायलचा सीक्वेल येत आहे. आजही घायलच्या आठवणी ताज्या आहेत. ऍक्शन हा घायलचा आत्मा होता. २५ वर्षात ऍक्शनमध्ये बरेच बदल झाले आहेत. आज हिरो जे ऍक्शन सीन करतात ते मी त्यावेळीच केले आहेत. त्यामुळे सध्या गरज आहे ती चांगल्या कथानकांची.’’
बर्याच वर्षांपासून काळाच्या पडद्याआड गेलेली मिनाक्षी शेषाद्रीही या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मागील बर्याच वर्षापासून मिनाक्षीने चित्रपटात काम केले नाही. घायलमधील या दोघांची जोडी त्यावेळी प्रचंड गाजली होती.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा