अल्लू अर्जुनचा दुसरा हिंदी चित्रपट २६ जानेवारीला येणार

हैदराबाद, १८ जानेवारी – दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुनने गेल्या वर्षीची सांगता ब्लॉकबस्टर ‘पुष्पा’ या चित्रपटाने केली होती. या चित्रपटाने ३०० कोटीहून अधिक कमाई केली. त्याच्या हिंदी वर्जनलाही बॉक्स ऑफिसवर तुफान प्रतिसाद मिळाला होता. आता २००२ ची सुरुवातही तो आणखी एका ब्लॉकबस्टर चित्रपटाने करणार असून, त्याची तयारी सुरू झाली आहे. त्याचे चित्रपट बर्याचदा तमिळ, तेलुगू, कन्नड आणि मल्याळम् या दक्षिण भारतीय भाषेत प्रदर्शित होत असतात. त्याच्या ‘पुष्पा’ चित्रपटाला हिंदी भाषेतील प्रेक्षकांनी उदंड प्रतिसाद दिल्याने, त्याचे हिंदी भाषेतील फॉलोअर्सही वाढले आहेत. हे चाहते ‘पुष्पा’ चित्रपटाच्या दुसर्या भागाची प्रतीक्षा करीत होते. त्यासाठी अजून अकरा महिने थांबावे लागणार होते. अशातच त्याचा आणखी एक चित्रपट ‘अला वैकंठपुरमलो’ २६ जानेवारी रोजी प्रदर्शित होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा