‘आरआरआर’च्या प्रदर्शनाची तारीख ठरली

हैदराबाद, ३१ डिसेंबर – दाक्षिणात्य अभिनेता ज्युनियर एनटीआर आणि अभिनेता राम चरणचा आगामी चित्रपट ‘आरआरआर’च्या प्रदर्शनाची तारीख घोषित करण्यात आली. ठरवल्याप्रमाणे हा चित्रपट ७ जानेवारीला प्रदर्शित होणार असल्याची माहिती समोर आली आहे. विश्लेषक तरण आदर्श यांनी ट्विटरवर दिग्दर्शक एस. एस. राजामौली आणि स्वतःचा एक फोटो सामायिक करीत चित्रपट प्रदर्शनाची तारीख घोषित केली. ‘आरआरआर’ चित्रपटाचे प्रदर्शन ठरलेल्या तारखेला प्रदर्शित होणार असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली. या चित्रपटात ज्युनियर एनटीआर आणि राम चरणच्या मुख्य भूमिका आहेत. त्याच्यांसोबत बॉलीवूड अभिनेत्री आलिया भट्ट, अजय देवगण, समुथिरकणी हे कलाकार दिसणार आहेत. याआधी ‘आरआरआर’ चित्रपट १३ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता. परंतु, कोरोनाच्या पृष्ठभूमीवर निर्मात्यांनी चित्रपट प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून चाहते चित्रपटाची प्रतीक्षा करीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा