राम चरणच्या ’गुड मॉर्निंग’ने जागणार अमेरिका!

मुंबई, (२२ फेब्रुवारी ) – दक्षिण भारतीय सुपरस्टार राम चरण सध्या त्याच्या ’आरआरआर’ चित्रपटातील ’नातू नातू’ या गाण्यासाठी ऑस्कर नामांकन मिळाल्यामुळे चर्चेत आहेत. राम चरण अमेरिकेतील अनेक कार्यक्रमांचा भाग आहे. त्यामुळे या अभिनेत्याच्या चित्रपटाला जगभरातून प्रेम मिळाल्यानंतर आणि तो एका प्रसिद्ध अमेरिकन शोचा भाग असल्याची बातमी आल्यानंतर राम चरणची वाटचाल ग्लोबल स्टार बनण्याच्या दिशेने सुरू आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. वास्तविक, राम चरण एका लोकप्रिय टॉक शो ’गुड मॉर्निंग अमेरिका’मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून दिसणार असल्याची बातमी येत आहे.
हा कार्यक्रम भारतीय वेळेनुसार रात्री ११.३० वाजता एबीसी वर प्रसारित होईल. राम चरणसाठी ही पहिलीच वेळ आहे, जेव्हा तो आंतरराष्ट्रीय शोचा भाग असेल. मात्र, अभिनेत्याची वाढती लोकप्रियता पाहता तो जागतिक स्तरावर आपले स्थान मजबूत करत आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. यासह, अभिनेता दरवर्षी आयोजित केल्या जाणार्या प्रतिष्ठित ६ व्या हॉलीवूड क्रिटिक्स असोसिएशन पुरस्कारांचे होस्ट म्हणून देखील दिसणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा