आता गोबर गॅसवर चालणार गाडी!

देशात इलेक्ट्रिक वाहनांबाबत लोकांमध्ये क्रेझ वाढत आहे, त्याचप्रमाणे ईव्हीच्या विक्रीवरही त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. यावेळी ऑटो एक्स्पोमध्ये, देशातील सर्वात मोठी कार निर्माता कंपनी मारुती सुझुकीने देखील त्यांच्या इलेक्ट्रिक कार संकल्पनेचे अनावरण केले आहे. कंपनीच्या भविष्यातील प्लॅनमध्ये ६ इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश आहे जी ऋध२०३० पर्यंत बाजारात आणण्यासाठी तयार आहेत.
मारुती सुझुकीची मूळ कंपनी सुझुकी मोटर कॉर्पोरेशन ने भारतीय बाजारपेठेसाठी आपली उत्पादन योजना शेअर केली आहे. सुझुकी केवळ इलेक्ट्रिक वाहनेच देणार नाही तर कार्बन न्यूट्रल खउए इंजिन वाहने देखील पुरवेल जी सी एन जी, बायोगॅस आणि इथेनॉल मिश्रित इंधनावर चालतील. मारुती ईव्ही एक्स हे ब्रँडचे पहिले इलेक्ट्रिक वाहन म्हणून बाजारात आणले जाईल, असेही कंपनीने स्पष्ट केले आहे. कंपनी या दशकाच्या अखेरीस १५% बॅटरी इलेक्ट्रिक वाहन (बीईव्ही , २५% हायब्रिड इलेक्ट्रिक वाहन (एचईव्ही ) आणि ६०% हायब्रिड पॉवरट्रेनचे लक्ष्य घेऊन पुढे जात आहे. सुझुकी कॉर्पोरेशन विविध देशांच्या सरकारांनी ठरवून दिलेल्या मुदतीनुसार कार्बन न्यूट्रॅलिटीचे उद्दिष्ट साध्य करण्याच्या योजनेवर काम करत आहे, जे जपान-युरोपमध्ये २०५० पर्यंत आणि भारतात २०७० पर्यंत पूर्ण होईल.
बायोगॅसवर चालणार कार
कंपनी बायोगॅस व्यवसायावरही लक्ष केंद्रित करेल, ज्यामध्ये गुरांच्या शेणापासून तयार केलेल्या बायोगॅसचे उत्पादन आणि पुरवठा केला जाईल. हा बायोगॅस सुझुकीच्या सीएनजी मॉडेलसाठी वापरला जाऊ शकतो ज्याचा भारतातील सीएनजी कार बाजारपेठेतील सुमारे ७०% वाटा आहे. एका दिवसात १० गायींच्या शेणापासून तयार होणारा बायोगॅस एका दिवसासाठी गाडी चालवण्यासाठी पुरेसा आहे, असेही या अहवालात सांगण्यात आले आहे. अलीकडे मारुती सुझुकीने स्विफ्ट, एक्सएल६ आणि बलेनो सारख्या मॉडेल्सचे सी एन जी प्रकार सादर केले आहेत. डिझेल इंजिन बंद केल्यानंतर कंपनी सीएनजी मॉडेल्सवर अधिक लक्ष केंद्रित करत आहे. कंपनीने यावेळी ऑटो एक्सपोमध्ये आपल्या प्रसिद्ध हॅचबॅक कार मारुती वॅगन आरचे नवीन फ्लेक्स इंधन मॉडेल देखील प्रदर्शित केले.
बायोगॅस हा ऊर्जेचा चांगला आणि किफायतशीर स्त्रोत आहे. जगात सर्वाधिक गुरांची संख्या भारतात आहे, त्यामुळे बायोगॅसच्या विकासासाठी प्रचंड क्षमता आहे. बायोगॅस (मिथेन किंवा गोबर गॅस) कमी तापमानात गुरांचे मलमूत्र (शेण) डायजेस्टरमध्ये चालवून आणि सूक्ष्मजंतू निर्माण करून मिळवला जातो. बायोगॅस हे जैवरासायनिक प्रक्रियेद्वारे तयार केले जाते, ज्या अंतर्गत विशिष्ट प्रकारचे जीवाणू सेंद्रिय कचर्याचे बायोगॅसमध्ये रूपांतर करतात. त्याचा मुख्य घटक हायड्रोकार्बन आहे, जो ज्वलनशील आहे आणि जळल्यावर उष्णता आणि ऊर्जा मिळते. सुझुकीने बायोगॅसच्या पडताळणीसाठी नॅशनल डेअरी डेव्हलपमेंट बोर्ड, भारत सरकारची एजन्सी आणि आशियातील सर्वात मोठी डेअरी उत्पादक बनास डेअरी यांच्यासोबत सामंजस्य करार केला आहे. याशिवाय कंपनीने जपानच्या फ्युजीसान असागिरी मध्येही गुंतवणूक केली आहे. जे शेणापासून मिळणार्या बायोगॅसपासून वीज निर्मिती करते. सुझुकीने ही गुंतवणूक ऑक्टोबर २०२२ मध्ये केली होती. २०२१ मध्ये स्थापन झालेल्या असगिरी बायोमास प्लांटची मार्च २०२३ पर्यंत वीज विक्री सुरू करण्याची योजना आहे.

on - गुरुवार, २ फेब्रुवारी, २०२३,
Filed under - विज्ञान भारती
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा