’बँक ऑफ इंडिया’च्या रिक्त जागांसाठी असा करा अर्ज

नागपूर, (१४ फेब्रुवारी ) – बँक ऑफ इंडिया ने प्रोबेशनरी ऑफिसर च्या ५०० पदांची भरती प्रक्रिया सुरु केली आहे. यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया ११ फेब्रुवारीपासून सुरू झाली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट bankofindia.co.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख २५ फेब्रुवारी २०२३ असणार आहे.
पात्रता, निवड प्रक्रिया आणि इतर तपशीलांसाठी अधिकृत अधिसूचना देखील तपासू शकता. शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा यासह सर्व माहिती अधिसूचनेत असेल. याशिवाय सामान्य / ईडब्लूएस / ओबीसी उमेदवारांना अर्ज करण्यासाठी ८५० रुपये भरावे लागतील. तर एससी/एसटी/पीडब्लूडी उमेदवारांसाठी रु. १७५. यातील सामान्य बँकिंग स्ट्रीममध्ये क्रेडिट ऑफिसर पदाच्या ३५० जागा आहेत. तर स्पेशलिस्ट स्ट्रीममधील आयटी अधिकारीसाठी १५० रिक्त जागा असणार आहेत. अर्ज केलेल्या उमेदवारांची निवड ऑनलाइन चाचणी, जीडी आणि वैयक्तिक मुलाखतीद्वारे केली जाईल. उमेदवारांची अंतिम निवड उमेदवारांनी ऑनलाइन परीक्षा, वैयक्तिक मुलाखत आणि गटचर्चेत मिळवलेल्या गुणांच्या आधारे केली जाईल.

on - मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०२३,
Filed under - युवा भारती
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा