रजनीकांत यांचा १७० वा चित्रपट पुढील वर्षी प्रदर्शित!

मुंबई, (२ मार्च) – रजनीकांत यांच्या १७० व्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. आज लायका प्रॉडक्शनने आपल्या सोशल मीडिया अकाउंटवरून याची घोषणा केली आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन जय भीम फेम दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल करणार आहेत. रजनीकांत सध्या त्याच्या आगामी ’जेलर’ चित्रपटात व्यस्त आहेत. त्याचा हा १६९ वा चित्रपट आहे. लायका प्रॉडक्शनचे चेअरमन सुभास्करन यांच्या वाढदिवसाच्या खास मुहूर्तावर रजनीकांत यांच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाच्या संगीताची जबाबदारी अनिरुद्ध रविचंदर यांच्या खांद्यावर असणार आहे. सध्या या चित्रपटाच्या शीर्षकाबद्दल कोणतीही माहिती नाही. २०२४ पर्यंत हा चित्रपट प्रदर्शित होईल असे बोलले जात आहे.
रजनीकांतच्या ’जेलर’ नेल्सन दिलीपकुमार दिग्दर्शित हा चित्रपट याच वर्षी प्रदर्शित होणार आहे. रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग जेलमध्ये झाले आहे. कन्नड सुपरस्टार शिवा राजकुमारही या चित्रपटाद्वारे तमिळमध्ये पदार्पण करत आहे. त्याचबरोबर मोहनलाल यात कॅमिओ करताना दिसणार आहे. याशिवाय योगी बाबू, त्रिशा कृष्णन, तमन्ना भाटिया, जॅकी श्रॉफ आणि सुनील हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा