४०० कोटी क्लबमध्ये, गदर २

मुंबई, (२३ ऑगस्ट) – कोरोना लॉकडाऊननंतर बॉलिवूडने जबरदस्त पुनरागमन केले आहे. २०२३ मध्ये पठाणसोबत सुरू झालेली बॉक्स ऑफिसवरील यशाची ही मालिका अजूनही सुरू आहे. बॉलिवूडचे चांगले दिवस परत आले आहेत. ऑगस्टमध्ये बॉलीवूड धुमाकूळ घालत आहे आणि यामध्ये सर्वात मोठे योगदान म्हणजे सनी देओलचा चित्रपट गदर २. बॉक्स ऑफिसवर त्याच्या जबरदस्त कमाईने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे.
२२ वर्षांनंतर परतल्यावर तारा सिंह एवढा गाजावाजा करतील, असे कुणालाही वाटले नव्हते. अनिल शर्मा दिग्दर्शित गदर २ ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला आहे. या चित्रपटाने १२ दिवसांत ४००.७० कोटींचा गल्ला जमवला आहे. गदर २, जो सनी देओलचा पहिला ४०० कोटींचा चित्रपट बनला आहे, तो दररोजच्या कलेक्शनसह धुमाकूळ घालत आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शच्या म्हणण्यानुसार, सनीच्या सिनेमाने मंगळवारी जवळपास १२.१० कोटींची कमाई केली आहे. गदर २ ने भारतात ४००.७० कोटी जमा केले आहेत. दुसर्या मंगळवारी चित्रपटाच्या कमाईत थोडीशी घसरण नक्कीच झाली आहे, तरीही चित्रपट धमाल करत आहे. गदर २ ने कामाच्या दिवसातही मजबूत पकड राखली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा