’गदर २’ वर्ल्डवाइड कलेक्शन ६०० कोटींच्या जवळ

मुंबई, (२८ ऑगस्ट) – सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा चित्रपट गदर २ थांबायला तयार नाही. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कमाई करत आहे. तारा सिंगचा हातोडा देशासह परदेशातही धुमाकूळ घालत आहे. सकीना आणि तारा सिंगच्या जोडीला जे प्रेम मिळतंय ते जगभर पाहायला मिळत आहे. गदर २ ने रिलीजच्या काही दिवसांतच इतका झपाट्याने व्यवसाय केला की वर्ल्डवाइड आता ६०० कोटी क्लबमध्ये प्रवेश करणार आहे.
गदर २ चित्रपटगृहात प्रदर्शित होऊन आता १७ दिवस झाले आहेत. यासह या चित्रपटाने परदेशातील ५० कोटी क्लबमध्ये प्रवेश केला आहे. एका अहवालानुसार, गदर २ ने रविवारी म्हणजेच २७ ऑगस्ट रोजी परदेशात ५५ कोटींचा व्यवसाय केला. त्याचवेळी, भारतात या चित्रपटाने १७ दिवसांत ५३८ कोटींचा गल्ला जमवला. यासह, गदर २ चे जगभरातील कलेक्शन ५९३ कोटींवर पोहोचले आहे, जे येत्या काही दिवसांत हा चित्रपट ६०० कोटी क्लबमध्ये आरामात प्रवेश करणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा