पाकिस्तानात सत्तास्थापनेचा तिढा सुटला
लाहोर, (२३ फेब्रुवारी) – राष्ट्रीय निवडणूक झाल्यानंतर आठवडाभरापासून पाकिस्तानमध्ये सत्तास्थापनेसाठी पाकिस्तान मुस्लिम लीग नवाझ (पीपीएमएल-एन), पाकिस्तान पीपल्स पार्टी (पीपीपी) यांच्यात चर्चा सुरू होती. मात्र, आता दोन्ही पक्षात आघाडीवर एकमत झाले असून, कुणाला मंत्रिमंडळात किती जागा मिळेल, सत्तेत कुणाचा किती सहभाग राहील तसेच पंतप्रधानपदी कुणाची वर्णी लागणार यावर तोडगा निघाला आहे.
पीपीएमएल-एन व पीपीपी आघाडी स्थापन करण्यावर एकमत झाले असून, लवकरच सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. पीपीपी पक्षाचे नेते शाहबाज शरीफ पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मंगळवारी रात्री एकत्र पत्रपरिषद घेतली. यावेळी त्यांनी आमच्यात युती झाली असून, लवकरच सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याचे सांगितले.
शाहबाज शरीफ घेणार पंतप्रधानपदाची शपथ
पीपीचे अध्यक्ष बिलावल भुत्तो झरदारी यांनी सांगितले की, शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे पंतप्रधान होतील, तर पीपीचे सह-अध्यक्ष असिफ अली झरदारी यांची पाकिस्तानचे राष्ट्रपती म्हणून निवड केली जाईल. मंत्रिमंडळात कोणाला कोणती मंत्रिपदे दिली जातील याचा तपशाील लवकरच जाहीर केला जाणार असल्याचे ते म्हणाले. पाकिस्तानात ८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय निवडणूक झाली होती. या निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोपही करण्यात आला. पीटीआय पक्षाचे नेते इम्रान खान यांना पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार सर्वाधिक निवडून आले. त्यांना ९३ जागा मिळाल्या, तर पीपीएमएल-एनचे ७५ व पीपीपी पक्षाचे ५३ उमेदवार निवडून आले.

on - शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०२४,
Filed under - आंतरराष्ट्रीय , आशिया
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा