पंतप्रधानपद किंवा मुलीला पंजाबचे मुख्यमंत्रिपद
लाहोर, (१८ फेब्रुवारी) – एक तर पंतप्रधानपद व्हा किंवा मुलीला पंजाबचे मुख्यमंत्रिपद द्या, असे दोन पर्याय पाकिस्तानी लष्कराने ठेवल्याने नवाझ शरीफ यांचे चौथ्यांदा पंतप्रधान होण्याचे स्वप्न उधळले गेले आणि त्यांनी ऐनवेळी लहान भावाला पंतप्रधान केले, अशी माहिती पीएमएल-एन पक्षाच्या नेत्यांनी दिली. पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाझचे प्रमुख नवाझ शरीफ यांनी पंतप्रधानपदासाठी शाहबाज शरीफ यांचे नाव समोर केल्यानंतर पीएमएल-एन गटांमध्ये जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पंतप्रधानपद कुणाला मिळणार, याबाबत आधीच घोषणा झाली असताना, तीन वेळा हे पद भूषविणार्या नवाझ शरीफांना त्यापासून दूर का करण्यात आले, अशा चर्चा आता त्यांच्या पक्षात सुरू झाल्या आहेत.
मुलीच्या राजकीय कारकीर्दीसाठी पंतप्रधानपदाच्या शर्यतीतून माघार घेण्याचा निर्णय नवाझ शरीफ यांनी घेल्याची माहिती पक्ष सूत्रांनी वृत्तसंस्थेला दिली. आघाडी सरकारचे नेतृत्व करण्यासाठी नवाझ शरीफ चौथ्यांदा पंतप्रधान होऊ शकले असते. मात्र, त्यामुळे मुलीला पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाने हुलकावणी दिली असती. मुलीच्या प्रेमापोटी त्यांनी माघार घेतली, अशी माहिती एका नेत्याने दिली. ८ फेब्रुवारी रोजी झालेल्या निवडणुकीत त्यांच्या पक्षाने निराशाजनक कामगिरी केल्यानंतर लष्कराने त्यांच्यासमोर दोन पर्याय ठेवले, अशी माहिती सूत्रांनी दिली. बलाढ्य पाकिस्तानी लष्कराने आपल्या ७५ वर्षांपेक्षा जास्त वर्षांच्या अस्तित्वातील निम्म्यापेक्षा अधिक काळ सत्तापालट करणार्या पाकिस्तानवर राज्य केले तसेच सुरक्षा व परराष्ट्र धोरणाच्या बाबतीत बर्यापैकी सामर्थ्य राखले आहे.

on - रविवार, १८ फेब्रुवारी, २०२४,
Filed under - आंतरराष्ट्रीय , आशिया
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा