मालदीव राजनैतिक वादामुळे भारतीय पर्यटक श्रीलंकेकडे
जानेवारी २०२४ मध्ये मालदीवच्या तुलनेत श्रीलंकेत जास्त पर्यटक आल्याचे मालदीवियन आउटलेट अधाधुने नोंदवले. लॉकडाऊननंतर, श्रीलंका मालदीवच्या तुलनेत पर्यटनात मागे पडली आहे. परंतु अलीकडील वादामुळे त्याचा खूप फायदा होत आहे. जानेवारी महिन्यात भारतातून श्रीलंकेत येणार्या पर्यटकांच्या संख्येत १०० टक्क्यांनी वाढ झाल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. अहवालानुसार, जानेवारी महिन्यात १९२,३८५ पर्यटकांनी मालदीवला भेट दिली, तर याच कालावधीत २०८,२५३ पर्यटकांनी श्रीलंकेला भेट दिली. जानेवारी २०२३ च्या तुलनेत ही संख्या १ लाखांहून अधिक आहे.
मालदीवच्या काही मंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारताविरोधात केलेल्या टिप्पण्यांनंतर जानेवारीमध्ये माले आणि नवी दिल्ली यांच्यात वाद सुरू झाला होता. भारतीय पर्यटकांनी यावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत ’मालदीववर बहिष्कार घाला’ मोहीम सुरू केली. श्रीलंकेत भारतीय पर्यटकांची संख्या१३,७५९ वरून ३४,३९९ झाली आहे. जर आपण वर्ष २०२३ बद्दल बोललो, तर जानेवारी महिन्यात १७,०२९ भारतीय पर्यटक मालदीवमध्ये पोहोचले होते, तर या वर्षी जानेवारी २०२४ मध्ये केवळ १५,००६ पर्यटक मालदीवमध्ये पोहोचले होते.
जानेवारी २०२४ मध्ये भारतातून ३४,३९९, रशियातून ३१,१५९, ब्रिटनमधून १६,६६५, जर्मनीतून १३,५९३ आणि चीनमधून ११,५११ पर्यटक श्रीलंकेत पोहोचले आहेत. मालदीवच्या पर्यटन बाजारपेठेबद्दल बोलायचे झाले, तर चीन पुन्हा एकदा पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. गेल्या वर्षी भारत या यादीत पहिल्या क्रमांकावर होता, आता तो पाचव्या स्थानावर घसरला आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार १ जानेवारी ते ४ फेब्रुवारी या कालावधीत चीनमधून २३,९०० पर्यटक मालदीवमध्ये आले. येणार्या पर्यटकांच्या एकूण संख्येच्या हे प्रमाण ११ टक्के आहे. रशिया या यादीत दुसर्या क्रमांकावर आहे, जिथून सुमारे २२,००० पर्यटक आले.
इटलीहून आलेल्यांची संख्या अंदाजे २१,००० होती. ब्रिटनमधून सुमारे १८,००० पर्यटक मालदीवमध्ये पोहोचले आहेत, तर भारत या यादीत पाचव्या स्थानावर आहे जिथून रविवारपर्यंत सुमारे १६,००० लोक मालदीवमध्ये पोहोचले आहेत. नुकतेच भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनीही भारतीय पर्यटकांना श्रीलंकेला भेट देण्याचे आवाहन केले होते. भारतीयांनी बहिष्कार टाकल्यानंतर मालदीवचे राष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइझू यांनी त्यांच्या चीन दौर्यात चीन सरकारला मालदीवमध्ये अधिक चिनी पर्यटक पाठवण्याची विनंती केली होती.

on - सोमवार, ५ फेब्रुवारी, २०२४,
Filed under - आंतरराष्ट्रीय , आशिया , छायादालन
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा