रा.स्व संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात

नागपूर, (१५ मार्च) – नागपूर येथील रेशीमबागच्या डॉ. हेडगेवार स्मृती मंदिर परिसरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली. महर्षी दयानंद सरस्वती सभागृहात होत असलेल्या या सभेला सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे उपस्थित आहे. सभेची सुरुवात भारत मातेच्या छायाचित्राला पुष्पार्पणाने झाली.
संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का यांच्यासह संपूर्ण भारतातून जवळपास १५०० च्यावर स्वयंसेवक, महिला पदाधिकारी उपस्थित आहेत. तब्बल ६ वर्षानंतर नागपुरात अखिल भारतीय प्रतिनिधी सभेचे आयोजन होत आहे. याप्रसंगी सहसरकार्यवाहक डॉ. मनमोहन वैद्य यांनी उदघाटन सत्रानंतर उपस्थित पत्रकारांशी संवाद साधला. त्यांच्यासह मंचावर अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर, सहप्रमुख नरेंद्रकुमार आणि अलोककुमार यांची उपस्थिती होती.

on - शुक्रवार, १५ मार्च, २०२४,
Filed under - नागरी , रा. स्व. संघ , राष्ट्रीय
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा