पंतप्रधान मोदी आज केरळ, तामिळनाडू आणि तेलंगणा दौर्यावर

नवी दिल्ली, (१५ मार्च) – लोकसभा निवडणुकीला आता अवघे काही दिवस उरले असून भाजपाने दक्षिणेत आपली पकड मजबूत करण्यासाठी प्रचार सुरू केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज केरळ, तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये पक्षाच्या प्रचाराचे नेतृत्व करणार आहेत. पंतप्रधान मोदी सकाळी १०.३० वाजता केरळमधील पथनामथिट्टा येथे पोहोचतील, जिथे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष के सुरेंद्रन त्यांचे स्वागत करतील.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान येथे एका जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. या सभेला सुमारे एक लाख लोक उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
एनडीएचे लोकसभा खासदार व्ही मुरलीधरन, अनिल के अँटनी, शोभा सुरेंद्रन आणि बैजू कलसाला हे देखील या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. केरळचे माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांची कन्या पद्मजा वेणुगोपालही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पद्मजा वेणुगोपाल यांनी अलीकडेच काँग्रेसशी संबंध तोडले आहेत. पीएम मोदी आज तेलंगणातही प्रचार करणार आहेत. आज संध्याकाळी ते मलकाजगिरी येथे रोड शोमध्ये सहभागी होणार आहेत. यादरम्यान त्यांच्यासोबत पक्षाचे लोकसभा उमेदवार एटाळा राजेंद्र आणि केंद्रीय मंत्री जी किशन रेड्डी हे देखील सामील होतील. रोड शोच्या निमित्ताने पोलिसांनी सर्वसामान्यांसाठी ट्रॅफिक अॅडव्हायजरी जारी केली आहे. रोड शो संपेपर्यंत काही भाग जनतेसाठी मर्यादित राहतील. राजभवनात रात्र घालवल्यानंतर पंतप्रधान मोदी उद्या नागरकुर्नूल येथील सभेला उपस्थित राहणार आहेत. रविवारी चिलाकलुरीपेटा येथे भाजपा-टीडीपी आणि जनसेना यांच्या संयुक्त बैठकीला पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा