१०३ वर्षांचे आजोबा म्हणतात; छे! मी घरून मतदान करणार नाही!

सांगली, (२१ मार्च) – सुशिक्षित वर्गामध्ये मतदान करण्याविषयी फारशी रुची दिसून येत नाही. मात्र अशाही स्थितीत काहीजण प्रकाशाचा किरण बनतात. असाच एक किरण शिराळामध्ये आहे. त्यांचे नाव महादेव दंडगे, स्वातंत्र्य सैनिक, वय वर्ष फक्त १०३! या वयातही देशप्रेम, कणखरता, जिद्द या शब्दांनी ओतप्रोत भरलेलं, एक समृद्ध, सफल आयुष्य!

ही गोष्ट आहे एका देशप्रेमी मतदाराची ! शिराळा मतदार संघ विधानसभेला सांगली जिल्ह्याशी तर लोकसभेला कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदार संघाशी जोडलेला आहे. या मतदारसंघाची पाहणी करण्यासाठी तेथील निवडणूक निर्णय अधिकारी संजय शिंदे हे गेले होते. सोबत शिराळ्याच्या तहसीलदार श्यामला खोत या ही होत्या. यंदा निवडणूक आयोगाने ८५ वर्षांपुढील तसेच अंध मतदारासाठी विशेष बाब म्हणून घरातूनच मतदान करण्याची सोय या निवडणुकीत केली आहे.
निवडणूक आयोगाच्या या मतदान उपक्रमाबाबत माहिती सांगण्यासाठी शिंदे यांनी शिराळाचा दौरा केला. यावेळेस त्यांना या ठिकाणी दंडगे नावाचे स्वातंत्र्य सैनिक (वय -१०३ )असल्याचे समजले. त्यांची शिंदे यांनी आपुलकीने भेट घेत घरून मतदान करण्याबाबत सुचित केले. त्यावर दंडगे यांनी स्मित हास्य करत सांगितले,’’छे…छे ! मी घरून मतदान करणार नाही तर प्रत्यक्ष मतदान केंद्रावर जाऊनच त्या ठिकाणी मतदान करणार.’’ त्यांची ही जिद्द पाहून निवडणूक निर्णय अधिकारी शिंदे ही क्षणभरासाठी थबकले. जर या १०३ वर्षाच्या नवतरुण मतदाराचा आदर्श मतदानाकडे पाठ फिरविणार्‍या नागरिकांनी घेतला तर जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचं हे मोठं यश ठरणार आहे.

✎ Edit

Posted by - Admin,
on - सोमवार, २५ मार्च, २०२४,
Filed under -
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS