उदयनराजे भाजपाच्या तिकिटावर लढण्यास ठाम
सातारा, (२५ मार्च) – महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघाची जागा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी डोकेदुखी ठरत आहेत. महायुतीकडून साताऱ्यात उदयनराजे भोसले यांना उमेदवारी देण्यावर एकमत झाले आहे. मात्र, महायुतीत ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडेच राहणार असल्याच्या भूमिकेवर अजित पवार कायम आहेत. त्यामुळे उदयनराजेंनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव त्यांनी दिला. मात्र, उदयनराजे भाजपाच्या कमळावरच निवडणूक लढवण्याच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे महायुतीत सातारा लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटता सुटत नसल्याचे चित्र आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी उदयनराजे भोसले इच्छुक आहे. मात्र, भाजपाकडून जाहीर करण्यात आलेल्या यादीत त्यांचे नाव नसल्याने त्यांनी थेट दिल्ली गाठली आहे. मागील तीन दिवसांपासून दिल्लीत ठाण मांडून असलेल्या उदयनराजे भोसले यांनी शनिवारी रात्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे अमित शाह यावर काही तोडगा काढणार, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघ राकाँचा बालेकिल्ला समजला जातो. त्यामुळे महायुतीत देखील या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून दावा केला आहे. अशात उदयनराजे भोसले भाजपाकडून या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, पण अजित पवारांकडून या मतदारसंघावर दावा करण्यात आल्याने भाजपाची कोंडी झाली. अशात उदयनराजे यांनी घड्याळ चिन्हावर निवडणूक लढवावी, असा प्रस्ताव अजित पवारांकडून देण्यात आला आहे. मात्र, कोणत्याही परिस्थितीत राकाँ हा मतदारसंघ सोडणार नसल्याची भूमिका अजित पवारांची आहे.

on - सोमवार, २५ मार्च, २०२४,
Filed under - महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा