सिक्कीम, ओडिशा, आंध्र, अरुणाचल विधानसभा निवडणुकीचीही घोषणा
६० सदस्यीय अरुणाचल प्रदेश विधानसभेसाठी राज्यातील लोकसभेच्या पहिल्या टप्प्यासोबत म्हणजे १९ एप्रिलला मतदान होईल. ३२ सदस्यीय सिक्कीम विधानसभेसाठीही १९ एप्रिललाच निवडणूक होणार आहे. १४७ सदस्यांच्या ओडिशा विधानसभेसाठी १३ मे, २० मे, २५ मे आणि १ जून अशा चार टप्प्यांत मतदान होणार आहे. पहिल्या टप्प्यात २८ जागांसाठी १३ मे, दुसर्या टप्प्यात ३५ जागांसाठी २० मे, तिसर्या टप्प्यात ४२ जागांसाठी २५ मे तर चौथ्या आणि शेवटच्या टप्प्यात ४२ जागांसाठी १ जूनला मतदान होणार आहे. चार राज्यातील विधानसभा निवडणुकीची मतदोजणी लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसोबत ४ जूनला होणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा