भाजपाची १९५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर

Bjp Flag

नवी दिल्ली, (०२ मार्च) – आगामी येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून शनिवारी पहिली उमेदवारी यादी जाहीर करण्यात आली. भाजपच्या पहिल्या यादीत एकूण १९५ उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांच्या नावांचा समावेश आहे. दिल्लीतील भाजपच्या मुख्यालयात पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा करण्यात आली. भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांनी उमेदवारांच्या नावांची घोषणा केली. यावेळी त्यांनी भाजप सलग तिसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी होईल, असे सांगितले. भाजपच्या पहिल्या यादीत १६ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशातील उमेदवारांचा समावेश आहे.
कोण कुठून निवडणूक लढवणार?
पंतप्रधान मोदी वाराणसीतून, शिवराज सिंह चौहान विदिशा, ज्योतिरादित्य सिंधिया गुना, आलोक शर्मा भोपाळ, व्हीडी शर्मा खजुराहो, अर्जुन राम मेघवाल बिकानेर, भूपेंद्र यादव अलवर, गजेंद्र सिंह शेखावत जोधपूर, कैलाश चौधरी बारमेर, कोटा ओम येथून बिर्ला यांनी अरुणाचल पश्चिममधून किरेन रिजिजू यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपच्या लोकसभा उमेदवारीबाबत बराच खल
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची गुरुवारी नवी दिल्लीत बैठक पार पडली होती. ही बैठक रात्री साडेतीन वाजेपर्यंत सुरु होती. या बैठकीत भाजपच्या लोकसभा उमेदवारीबाबत बराच खल झाला होता. या बैठकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाध्यक्ष जेपी नड्डा आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित होते. या बैठकीत १५० ते २०० उमेदवारांच्या नावांची चर्चा झाल्याचे सांगितले जात होते. त्यानंतर आज अखेर भाजपकडून उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत.
भाजप उमेदवार –
वाराणसी – नरेंद्र मोदी
अंदमान निकोबार – विष्णू पडा रे
अरुणाचल पश्चिम – किरण रिजिजू
अरुणाचल पूर्व – तपिर गावो
आसाम
सिलचर – परिमल शुक्ल वैद्य
गुवाहाटी – बिजुली कलिता
तेजपुर – रणजित दत्ता
नौगाव – सुरेश बोरा
दिबृगड – सर्वानंद सोनोवाल
छत्तीसगड
विलापसुर – तोखन साहू
राजनंदगाव – संतोष पांडे
रायपूर – ब्रिजमोहन अग्रवाल
बस्तर – महेश कश्यप
दादरा नगर हवेली- लालुभाई पटेल
दिल्ली
चांदनी चौक – प्रवीण खंडेलवाल
उत्तर पूर्वी दिल्ली – मनोज तिवारी
दिल्ली – बांसुरी स्वराज
दक्षिण दिल्ली – रामविर सिंग बिधुडी
उत्तर गोवा – श्रीपाद नाईक
गांधीनगर – अमित शाह
राजकोट – पुरुषोत्तम रुपाला
पोरबंदर – मनसुख मांडवीय
नौसारी – सी. आर पाटील
जम्मू काश्मीर- डॉ. जितेंद्र सिंग
कोडरमाल – अन्नपूर्णा देवी
हजारीबाग – मनीष जैस्वाल
केरळ
कासरगोड – एम एल अश्विनी
कन्नूर – प्रफुल्ल कृष्ण
कोझिकोडे – एम टी रमेश
त्रिसुर – सुरेश गोपी
अल्पुझा – शोभा सुरेंद्र
अटींगल – वी मुरलीधरन
गुना – ज्योतिरादित्य सिंधिया
भोपाल – देवल शर्मा
बिकानेर – अर्जुन राम मेघवाल (केंद्रीय मंत्री)
अलवर – भूपेंद्र यादव (केंद्रीय मंत्री)
भरतपूर-रामस्वरुप कोहली
जोधपूर – गजेंद्र सिंह शेखावत
चित्तोडगड – सी पी जोशी
कोटा- ओम बिर्ला
तेलंगणा
करीमनगर-बंडी संजयकुमार
निझामाबाद – अरविंद धर्मापूरी
त्रिपुरा – विप्लव कुमार देव
नैनिताल – अजय भट ( केंद्रीय मंत्री)
गौतम बुद्धनगर – डॉ महेश शर्मा
बुलंद शहर – भोला सिंह
मथुरा – हेमा मालिनी
एटा – राजू भैय्या
खिरी – अजय मिश्रा टेनी
उनाव – साक्षी महाराज
लखनऊ – राजनाथ सिंह
अमेठी – स्मृती इराणी
कनौज – सुब्रत पाठक
गोरखपूर – रवी किशन
पासगाव – कमेलश पासवान
जौनपुर – कृपा शंकर सिंह
कुंजबिहार – निशिथ प्रामाणिक
मुर्शिदाबाद – गौरी शंकर घोष
युवराज सिंग, अक्षय कुमारही भाजपच्या तिकीटावर निवडणूक लढवणार?
सूत्रांच्या माहितीनुसार, यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपकडून काही सेलिब्रिटींनाही उमेदवारी दिली जाऊ शकते. यामध्ये भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग, बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार यांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. भाजपकडून युवराज सिंग याला पंजाबच्या गुरदासपूर या प्रतिष्ठेच्या लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी दिली जाऊ शकते. तर अभिनेता अक्षय कुमार याला चंदीगढ किंवा दिल्लीतील एखाद्या लोकसभा मतदारसंघातून कमळाच्या चिन्हावर निवडणुकीच्या रिंगणात उतरवले जाऊ शकते, अशी जोरदार चर्चा आहे.
लोकसभेचा उमेदवार निश्चित करण्यासाठी भाजपकडून सर्व इच्छूक नेत्यांची खोलवर जाऊन चौकशी करण्यात आली होती. संबंधित लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नेत्यांना पाठवून तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता. तसेच नमो अॅपच्या माध्यमातून नागरिकांकडून विद्यमान खासदारांविषयी माहिती जाणून घेण्यात आली होती. लोकसभेच्या एका जागेसाठी दोन ते तीन नेत्यांचा विचार करण्यात आला होता. त्यानंतर केंद्रीय निवडणूक समितीच्या बैठकीत अंतिम उमेदवाराची निवड करण्यात आली.

✎ Edit

Posted by - Admin,
on - शनिवार, २ मार्च, २०२४,
Filed under - ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS