चीनमधून कराचीला जाणारे क्षेपणास्त्र मुंबईत रोखले

मुंबई, (०२ मार्च) – चीनमधून कराचीला जाणार्या एका जहाजाला भारतीय सुरक्षा यंत्रणांनी मुंबईतील न्हावा शेवा बंदरात संशयाच्या आधारे अडवले आहे. या जहाजात काही संशयास्पद वस्तू आढळून आल्याची माहिती आहे ज्याचा वापर पाकिस्तानच्या आण्विक आणि बॅलेस्टिक क्षेपणास्त्र कार्यक्रमासाठी केला जाऊ शकतो. पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाशी संबंधित ही संशयास्पद खेप भारतीय बंदरात जप्त करण्यात आली आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे कस्टम अधिकार्यांनी संगणक संख्यात्मक नियंत्रण मशीनसह मालाची तपासणी केली.
संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या (डीआरडीओ) पथकाने पाकिस्तानला जाणार्या या जहाजाच्या मालाचीही पाहणी केली. त्यांनी सांगितले की, पाकिस्तान या मालाचा वापर अणुकार्यक्रमासाठी करू शकतो.

on - रविवार, ३ मार्च, २०२४,
Filed under - गुन्हे-न्याय , राष्ट्रीय
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा