निक्की हेलीने ट्रम्प यांचा पराभव करून रचला इतिहास
रिपब्लिकन पक्षाची प्राथमिक निवडणूक जिंकणारी निक्की हेली अमेरिकेच्या इतिहासातील पहिली महिला ठरली आहे. मात्र, अध्यक्षपदाच्या शर्यतीत ट्रम्प यांचा दावा जोरदार आहे. निक्की हेली यांनी काही दिवसांपूर्वी सांगितले होते की, डोनाल्ड ट्रम्प सध्याचे राष्ट्राध्यक्ष जो बाइडन यांना पराभूत करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत मी शर्यतीतून मागे हटणार नाही. या शर्यतीत मी असल्यामुळे लोकांसमोर चांगले पर्याय असतील. अमेरिका पुन्हा डोनाल्ड ट्रम्प किंवा जो बाइडनला सहन राहू शकत नाही. वॉशिंग्टन डीसीमध्ये समर्थकांना संबोधित करताना निक्की हेली म्हणाली, जेव्हा मी अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली होती, तेव्हा १४ स्पर्धक होते आणि मी १२ जणांना हरवले होते. आता मला आणखी एक बाजी मारायची आहे.

on - सोमवार, ४ मार्च, २०२४,
Filed under - अमेरिका , आंतरराष्ट्रीय
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा