इसरोप्रमुखांना कर्करोग पण, मिशन पूर्ण केल्याशिवाय स्वस्थता नाही !

– वेळ लागेल पण मीच जिंकेन,
नवी दिल्ली, (०४ मार्च) – भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इसरोचे प्रमुख एस. सोमनाथ यांना कर्करोग झाला असून, त्यांची कॅन्सरशी झुंज चांद्रयान ३ या मोहिमेपासून सुरू आहे. प्रकृतीच्या कुरबुरी असल्या तरी हा कर्करोग असेल असे त्यांना वाटले नव्हते. आदित्य एल १ च्या लाँचिंग दिवशी आपल्याला पोटाचा कर्करोग झाला असल्याची माहिती मिळाली, असं त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं आहे. एस. सोमनाथ यांच्यावर उपचार सुरू असून त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यांच्यावर किमोथेरपी सुरू आहे. कर्करोगाला झुंज देत असतानाच कुटुंबिय आणि सहकार्यांनी आपल्याला हिंमत आणि मानसिक आधार दिल्याचे सोमनाथ यांनी स्पष्ट केले.
सोमनाथ यांना कॅन्सर झाल्याची माहिती मिळाल्यानंतर इस्रोमधील त्यांच्या सहकार्यांनाही धक्काच बसला. चंद्रयान मोहिमेनंतर त्यांनी पोटाचे स्कॅनिंग केले. तेव्हा त्यांना कर्करोग झाल्याची माहिती मिळाली. त्यांना पोटाचा कॅन्सर झालाय. पुढील उपचार घेण्यासाठी ते चेन्नईत गेले असून त्यांना हा आजार अनुवंशिकतेने झाला असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. त्यांचा आजार पूर्णपणे बरा व्हायला बराच वेळ लागेल. मात्र, हा लढा आपणच जिंकणार असल्याचा विश्वास सोमनाथ यांनी व्यक्त केला. ’’अनेकदा स्कॅनिंग, बर्याच वैद्यकीय तपासण्या झाल्या असून सध्या माझं पूर्ण लक्ष, मी माझं काम आणि इस्रोच्या मिशन्सवर केंद्रीत केलं आहे. इस्रोचे सर्व मिशन पूर्ण केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही,’’असेही सोमनाथ यांनी स्पष्ट केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा