सुप्रीम कोर्टाने स्टॅलिन यांना फटकारले

नवी दिल्ली, (०४ मार्च) – तामिळनाडू सरकारमधील मंत्री आणि मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे पुत्र उदयनिधी स्टॅलिन यांना सोमवारी सर्वोच्च न्यायालयाने फटकारले. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त विधान केले होते. सनातन धर्माचे निर्मूलन करण्याबाबत ते बोलले. या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने स्टॅलिन यांना सांगितले की, तुम्ही सामान्य माणूस नाही. तुम्ही मंत्री आहात. तुम्हाला त्याचे परिणाम कळले पाहिजेत.
न्यायालयाने म्हटले, तुम्ही राज्यघटनेच्या कलम १९(१)(अ) चे उल्लंघन केले आहे. तुम्हाला तुमच्या शब्दांचे परिणाम माहीत नाहीत का? तुम्ही सामान्य माणूस नाही. तुम्ही मंत्री आहात. तुम्हाला त्याचे परिणाम कळले पाहिजेत. स्टॅलिन यांनी भाषण स्वातंत्र्याच्या अधिकाराचा गैरवापर केला, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. कोर्टाने स्टॅलिनच्या वकिलाला विचारले की, तुम्ही या प्रकरणी थेट सर्वोच्च न्यायालयात का आला आहात? न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली.
२ सप्टेंबर २०२३ रोजी उदयनिधी स्टॅलिन यांनी ’सनातन निर्मूलन परिषदेत’ सनातन धर्माची तुलना डेंग्यू आणि मलेरियासारख्या आजारांशी केली होती. त्याला विरोध करण्याची नाही तर खोडून काढण्याची गरज असल्याचे ते म्हणाले होते. उदयनिधी स्टॅलिन म्हणाले होते, काही गोष्टींना विरोध होऊ शकत नाही, त्या फक्त संपवल्या पाहिजेत. डेंग्यू, डास, मलेरिया आणि कोरोनाला आपण विरोध करू शकत नाही. ते आपल्याला संपवायचे आहेत. त्याचप्रमाणे सनातनलाही संपवायचे आहे. सनातन धर्माविरोधात वक्तव्ये केल्याप्रकरणी उदयनिधी स्टॅलिन यांच्यावर अनेक राज्यांमध्ये खटले दाखल करण्यात आले आहेत. स्टॅलिन यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करून त्यांच्याविरुद्ध दाखल केलेल्या सर्व एफआयआर एकत्र जोडल्या जाव्यात, अशी विनंती केली आहे. याप्रकरणी पुढील सुनावणी १५ मार्च रोजी होणार आहे.

on - सोमवार, ४ मार्च, २०२४,
Filed under - गुन्हे-न्याय , राष्ट्रीय
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा