जी-७ शिखर परिषदसाठी पंतप्रधान मोदी आज इटलीला होणार रवाना
परराष्ट्र सचिव विनय क्वात्रा यांनी नवी दिल्लीत सांगितले की, शुक्रवारी होणार्या परिषदेसाठी भारताला आउटरीच कंट्री म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. भारत आणि ग्लोबल साउथसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर होणार्या परिषदेत जागतिक नेत्यांशी संवाद साधण्याची ही भेट ही संधी असेल, असे ते म्हणाले. जी-७ शिखर परिषदेत भारताचा हा ११वा सहभाग असेल आणि पंतप्रधान मोदींचा सलग पाचवा सहभाग असेल. पंतप्रधान आउटरीच सत्राला उपस्थित राहणार आहेत. शिखर परिषदेच्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी जी ७ देशांच्या नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेण्याची शक्यता आहे.
पंतप्रधान मोदी इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांचीही भेट घेणार आहेत. स्वित्झर्लंडमध्ये होणार्या युक्रेन पीस समिटमध्ये भारत योग्य पातळीवर सहभागी होईल, असे परराष्ट्र सचिवांनी सांगितले. या महिन्यात स्वित्झर्लंडमध्ये होणार्या परिषदेत जवळपास ९० देश सहभागी होणार आहेत. या भेटीमुळे पंतप्रधान मोदींना भारत आणि ग्लोबल साउथसाठी महत्त्वाच्या मुद्द्यांवर शिखर परिषदेत उपस्थित असलेल्या इतर जागतिक नेत्यांशी संवाद साधण्याची संधी मिळेल.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा