सीतारामन् यांनी स्वीकारली अर्थमंत्रिपदाची सूत्रे, सातव्यांदा अर्थसंकल्प मांडणार
नवी दिल्ली, (१२ जुन) – केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी आज मंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. सीतारामन् यावेळी सातव्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प मांडणार आहेत. सीतारामन् यांनी आज नॉर्थ ब्लॉकस्थित अर्थमंत्रालयात जाऊन अर्थमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारली. यावेळी अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी आणि अर्थमंत्रालयाचे सचिव तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सीतारामन् या देशाच्या पहिल्या पूर्णकालीन महिला अर्थमंत्री आहेत. त्यांनी आतापर्यत संसदेत सहा अर्थसंकल्प सादर केले आहेत.
यावेळी जुलै महिन्यात होणार्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्या सातवा अर्थसंकल्प सादर करीत इतिहास घडवणार आहेत. राज्यसभेच्या सदस्य असलेल्या सीतारामन् यांची यावेळी सलग दुसर्यांदा अर्थमंत्री म्हणून नियुक्ती झाली. मोदी सरकारच्या दुसर्या कार्यकाळातही सीतारामन् अर्थमंत्री होत्या. मोदी सरकार एकमध्ये त्यांनी संरक्षणमंत्रिपद सांभाळले होते. मोदी सरकार एकमध्ये अरुण जेटली अर्थमंत्री होते. त्यांच्या निधनानंतर अर्थमत्रिपदाची धुरा सीतारामन् यांच्याकडे आली.
✎ Edit

Posted by - Admin,
on - बुधवार, १२ जून, २०२४,
Filed under -
अर्थ
,
राष्ट्रीय
You can follow any responses to this entry through the
RSS 2.0
Loading navigation...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा