२४ जूनपासून संसदेचे विशेष अधिवेशन
२४ आणि २५ जूनला नवनिर्वाचित सदस्यांचा शपथविधी होईल, २६ जूनला लोकसभा अध्यक्षपदाची निवडणूक होईल. २७ जूनला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे संसदेच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांसाठी अभिभाषण होईल. यावेळी आपल्या सरकारच्या पाच वर्षांच्या कार्यक्रमाचा आढावा त्या सादर करतील. त्यानंतर पंतप्रधान मोदी आपल्या मंत्रिपरिषदेचा संसदेला परिचय करून देतील. नंतर राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर दोन्ही सभागृहात चर्चा होऊन तो प्रस्ताव पारित केला जाईल. धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर देतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा