संविधान हत्या दिनविरोधातील याचिका हायकोर्टाने फेटाळली
त्यामुळे केंद्र सरकारने संविधान हत्या दिवस पाळण्यासाठी जारी केलेली अधिसूचना ही संविधानाचा अपमान करणारी आहे. शिवाय, ही अधिसूचना घटनेचे उल्लंघन करणारी आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्याने केला. मात्र, हंगामी मुख्य न्यायाधीश मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने तो अमान्य केला. केंद्र सरकारची १२ जुलै रोजीची अधिसूचना ही आणिबाणी लागू करण्याच्या विरोधात नसून, ती सत्तेचा गैरवापर आणि त्या काळात लोकांचे स्वातंत्र्य हिरावण्याच्या विरोधात आहे. त्यामुळे ही अधिसूचना घटनेचे उल्लंघन करणारी आहे, असे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने आपल्या निकालात स्पष्ट केले.

on - शुक्रवार, २६ जुलै, २०२४,
Filed under - गुन्हे-न्याय , राष्ट्रीय
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा