२३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन! : इसरो
– गेल्या वर्षी केलं होतं लॅण्डींग,
नवी दिल्ली, (२३ जुन) – भारतीय अंतराळ संशोधनाच्या इतिहासात मैलाचा दगड ठरलेला दिवस म्हणजे २३ ऑगस्ट! गेल्या वर्षी याच दिवशी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर आपल्या चांद्रयान-३ ने यशस्वी लॅण्डींग केलं होतं. हे यश साजरे करीत, नवसंशोधनाला प्रोत्साहन देण्यासाठी २३ ऑगस्ट हा दिवस राष्ट्रीय अंतराळ दिन म्हणून साजरा करण्याची घोषणा इसरोचे प्रमुख डॉ.एस.सोमनाथ यांनी केली आहे. यानिमित्त, इसरोच्या वतीने विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येणार असून, त्यामध्ये देशवासियांनी उत्साहाने सहभाग घ्यावा, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
इसरो प्रमुख डॉ.सोमनाथ यांनी आज एक्स म्हणजे ट्विटरवर एक व्हिडीओ जाहीर नकरून ही घोषणा केली आहे. २३ ऑगस्ट २०२३ रोजी संध्याकाळी ५ वाजून २० मिनिटांनी इसरोने चांद्रयान-३च्या लॅण्डींगचं लाईव्ह स्ट्रिमिंग सुरू केलं. युट्यूब, फेसबुक आणि इसरोच्या संकेतस्थळावरून कोट्यवधी भारतीयांसह लक्षावधी परदेशी लोकही भारताच्या या यशाचे साक्षीदार बनले. अगदी घरचे कार्य असल्यासारखे सामान्य लोक टिव्ही, कंप्युटर, मोबाईलच्या स्क्रीनवर डोळे खिळवून बसले होते.
लॅण्डींगच्या जागेपासून चांद्रयान-३ ३० किलोमीटर उंचीवर आणि ७४५ किलोमीटर लांब असताना, लॅण्डींगची प्रक्रीया सुरू झाली. लॅण्डींग एकूण ४ टप्प्यांमध्ये विभागलेले होते. प्रत्येक सेकंद आणि मीटर पूर्वनियोजित होते. अंतिम टप्प्यात १५० मीटरवरून ६० मीटर अंतरावर येण्यास, चांद्रयानाला ७३ सेकंद लागले. त्यापैकी, ५२ सेकंद रिटोरेगेटिंग म्हणजे लॅण्डींगसाठी सुरक्षित जागेचा शोध घेण्यात गेले. पुढील ३८ सेकंदांत आणखी ५० मीटरचं अंतर ओलांडून, अंतिम ९ सेकंदात लॅण्डींगची प्रक्रीया पूर्ण झाली. वेळेचं अचूक आणि सटीक गणित मांडल्यामुळे चांद्रयान यशस्वीपणे ‘लॅण्डङ्क झालं. विशेष म्हणजे लॅण्डींगमुळे हलकी धूळ उडाली. पण, ती खाली बसल्यानंतरच प्रग्यान रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर आलं आणि त्याने एक इतिहास रचला.

on - शुक्रवार, २६ जुलै, २०२४,
Filed under - राष्ट्रीय , विज्ञान-तंत्रज्ञान
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा