खेडकर कुटुंबीयांच्या उत्पन्नाची मागितली माहिती
वादग्रस्त पूजा खेडकरच्या प्रकरणाची केंद्र सरकारच्या कार्मिक विभागाकडून चौकशी सुरू आहे. अतिरिक्त सचिव दर्जाचे अधिकारी ही चौकशी करीत आहेत. या चौकशी समितीला स्थानिक प्रशासनाकडून सर्व माहिती दिली जाणे अपेक्षित आहे. पूजा खेडकरांचे आई-वडील विभक्त झाल्याचे तांत्रिकदृष्ट्या दाखवण्यात आले असले, तरी दोघांचे उत्पन्न तपासले जात आहे. त्याचबरोबर पूजा खेडकर यांच्या नावावर देखील कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याची माहिती सूत्रांनी दिली. हे सर्व तपशील पूजा खेडकरांनी आयकर विभागाकडे दाखल केलेल्या आयटीआरमधून समोर आले आहेत. ही सर्व माहिती अहमदनगरच्या जिल्हाधिकर्यांकडून गोळा केली जात आहे.
पूजा खेडकरांची पोलिसांसोबत साडेतीन तास चर्चा
पूजा खेडकरांची स्थानिक पोलिसांसोबत रात्री ११ ते पहाटे दोन वाजेपर्यंत चर्चा झाल्याची माहिती आहे. पूजा खेडकर मुक्कामी असलेल्या वाशीमच्या स्थानिक विश्रामगृहावर रात्री सव्वा दहा वाजता पोलिसांचे पथक पोहोचले होते. पूजा खेडकर यांची बंद दाराआड तीन तास चौकशी झाली. मात्र, हे पथक कुठचे होते, याची माहिती समोर आलेली नाही.
पोलिस करणार वैद्यकीय प्रमाणपत्राची चौकशी
पूजा खेडकर यांनी सादर केलेले वैद्यकीय प्रमाणपत्रे खरी आहेत का, याची तपासणी पुणे पोलिस करणार आहेत. दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या आयुक्त कार्यालयाकडून एक पत्र मिळाले आहे, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकार्याने सांगितले.

on - गुरुवार, १८ जुलै, २०२४,
Filed under - महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा