शिल्पकार अरुण योगीराज यांचा व्हिसा अमेरिकेने नाकारला
म्हैसूरस्थित शिल्पकाराने यावर्षी जानेवारी महिन्यात अयोध्येत नव्याने बांधलेल्या मंदिरात स्थापित ‘राम लल्ला’ची मूर्ती साकारली होती. अयोध्येतील भव्य अभिषेक सोहळ्यासाठी ते निमंत्रितांपैकी एक होते. म्हैसूर विद्यापीठातून एमबीए केलेले अरुण योगीराज यांनी एका खासगी कंपनीच्या मानव संसाधन विभागात सहा महिने प्रशिक्षण घेतले, परंतु त्यांनी आपली खाजगी नोकरी सोडून कौटुंबिक परंपरा पुढे नेण्यासाठी म्हैसूरला परत आले.
अरुण योगीराज यांनी यापूर्वी केदारनाथमध्ये स्थापित केलेला आदि शंकराचारांचा १२ फूट उंच पुतळा आणि दिल्लीतील इंडिया गेटजवळ स्थापित सुभाषचंद्र बोस यांचा पुतळाही तयार केला होता. अरुण योगीराज यांनी म्हैसूर जिल्ह्यातील चुंचनकट्टे येथे २१ फूट उंच हनुमानाची मूर्ती साकारली, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा १५ फूट उंच पुतळा, म्हैसूरमधील स्वामी रामकृष्ण परमहंस यांचा पांढरा अमृतशीला पुतळा आणि नंदीची ६ फूट उंचीची अखंड पुतळाही तयार करण्यात आला आहे.
अरुण योगीराज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, व्हिसा मिळविण्यासाठी जे कागदपत्रे लागतात, ती सर्व आम्ही पुरविली होती. तरीही व्हिसा का नाकारण्यात आला, याची कोणतीही माहिती सध्या देण्यात आलेली नाही.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा