बांग्लादेशात केले जात आहे हिंदूंना लक्ष्य!
एका वृत्तानुसार, २७ जिल्ह्यांमध्ये हिंदूंची घरे आणि दुकानांना लक्ष्य करण्यात आले आहे. मौल्यवान वस्तू लुटल्या आहेत. मंदिरांवरही हल्ले झाले आहेत. वृत्तानुसार, लालमोनिरहाट सदर उपजिल्हामध्ये धार्मिक हिंदू कार्यक्रमांशी संबंधित पूजा समितीचे सचिव प्रदीप चंद्र रॉय यांच्या घराची तोडफोड आणि लुटमार करण्यात आली आहे. सर्वपक्षीय बैठकीत परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर म्हणाले की, भारत सरकार बांगलादेशातील परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहे, परिस्थिती कशीही असली तरी त्याची माहिती दिली जाईल. परराष्ट्रमंत्र्यांनी सांगितले की, बांगलादेशमध्ये सुमारे १२ ते १३,००० भारतीय आहेत. परिस्थिती इतकी चिंताजनक नाही की त्यांना एअरलिफ्ट करण्याची गरज आहे. शेख हसीना भारतात राहणार की अन्य कोणत्या देशात राजकीय आश्रय घेणार याबाबत अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही.

on - मंगळवार, ६ ऑगस्ट, २०२४,
Filed under - आंतरराष्ट्रीय , आशिया
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा