अट्टम, कांतारा, कार्तिकेय २, केजीएफ २ ला राष्ट्रीय पुरस्कार
– दक्षिणात्य सिनेमांचा दबदबा,
– राष्ट्रीय पुरस्कार २०२४,
नवी दिल्ली, (१६ ऑगस्ट) – ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांच्या विजेत्यांची घोषणा शुक्रवारी म्हणजेच आज करण्यात आली. यंदा बॉलीवूडपेक्षा दक्षिणात्य सिनेमांचा बोलबाला पाहायला मिळाला. संपूर्ण मनोरंजन देणार्या सर्वोत्कृष्ट लोकप्रिय चित्रपटाचा पुरस्कार ’कांतारा’ या कन्नड चित्रपटाला देण्यात आला आहे. तर मल्याळम चित्रपट ’अट्टम’ला विविध श्रेणींमध्ये अनेक पुरस्कार मिळाले आहेत, पण सर्वात खास म्हणजे या चित्रपटाने यावर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. ’कार्तिकेय २’ ने सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे. ’केजीएफ २’ ला ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
दरवर्षीप्रमाणे, यंदाही ७० व्या राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये परेश मोकाशी दिग्दर्शित ‘वाळवी’ने सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा बहुमान पटकावला आहे. तर, ‘मुरमूर्स ऑफ द जंगल’ या मराठी डॉक्युमेंट्रीने, सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंट्री आणि सर्वोत्कृष्ट निवेदक असे दोन महत्त्वाचे पुरस्कार मिळवले आहेत.
सर्वोत्कृष्ट अभिनेता आणि अभिनेत्री
ऋषभ शेट्टी याला ‘कंतारा’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर, कच्छ एक्स्प्रेससाठी मानसी पारेख तसंच तिरुचित्रम्बलम सिनेमासाठी अभिनेत्री नित्या मेनन यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
’अट्टम’ला तीन श्रेणींमध्ये पुरस्कार मिळाले आहेत.
आनंद एकरशी यांना मल्याळम चित्रपट ’अट्टम’साठी सर्वोत्कृष्ट पटकथेचा पुरस्कार मिळाला आहे.
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ’अट्टम’ला सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
मल्याळम चित्रपट ’अट्टम’लाही सर्वोत्कृष्ट संपादनाचा पुरस्कार मिळाला.
याशिवाय या भाषांमधील चित्रपटांना सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ’काबेरी अंतरधन’ला सर्वोत्कृष्ट बंगाली चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ’वाळवी’ला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला आहे.
’कार्तिकेय २’ ने ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट तेलुगू चित्रपटाचा पुरस्कार पटकावला आहे.
’पोनियिन सेल्वन १’ ने ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट तमिळ चित्रपटाचा पुरस्कार जिंकला.
’केजीएफ चाप्टर २’ ला ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट कन्नड चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
’इमुथी पुथी’ला ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट आसामी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये ’दमन’ला सर्वोत्कृष्ट ओडिया चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
’बागी दी धी’ला ७० व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट पंजाबी चित्रपटाचा पुरस्कार मिळाला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा