हिंदुत्व शिल्लक असल्यास बांगलादेशातील अत्याचारावर बोला
मुंबई, (०८ ऑगस्ट) – हिंदुत्व सोडले नसल्याचा दावा करणार्या उद्धव ठाकरेंनी बांगलादेशाच्या परिस्थितीवरून भाकीत केले. मात्र, बांगलादेशातील हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावर ‘ब‘’ देखील उच्चारला नाही. तुमच्यात थोडही हिंदुत्व शिल्लक असेल तर, बांगलादेशातील अत्याचारांवर बोला, असे आव्हान भाजपाचे ज्येष्ठ नेते व माजी केंद्रीय मंत्री दानवे यांनी उद्धव ठाकरेंना दिले.
भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, प्रदेश समन्वयक विश्वास पाठक उपस्थित होते. दिल्ली दौर्यामधील पत्रकार परिषदेमधून बांगलादेशबाबत बोलताना ठाकरे यांनी अकलेचे तारे तोडले, बांगलादेशसारखी स्थिती भारतात देखील उद्भवू शकते. अशी चिथावणीखोर भाषा, हिंदुत्वापासून कोसो दूर उद्धव ठाकरे यांनी त्वरित थांबवावी असाही इशारा दानवे यांनी दिला. बांगलादेशमध्ये हिंदूंच्या हत्या होत असताना निषेध करण्याएवढेही उबाठा सेनेचे हिंदुत्व जागृत नाही, असा सणसणीत टोला त्यांनी लगावला.
दानवे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे राज्याच्या भल्यासाठी, जनतेच्या हितासाठी दिल्लीला जातात. त्यावेळी महाराष्ट्र दिल्लीच्या चालू देणार नाही या शब्दांत उद्धव ठाकरे टीका करतात. मग, हेच ठाकरे महाशय आता दिल्ली दौर्यावर का गेले, मुख्यमंत्रिपदाची याचना करण्यासाठी कोणाच्या दारात गेले, असा सवाल त्यांनी केला. दिल्ली दौर्यामध्ये ठाकरे यांनी आपणच किती कार्यक्षम मुख्यमंत्री होतो हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत विविध नेत्यांच्या भेटींदरम्यान मुख्यमंत्रिपदाची याचना करण्याचा पुरेपूर केला. महाविकास आघाडीतील एका सहकार्याने त्यांच्या पुस्तकात तत्कालीन मुख्यमंत्री ठाकरे त्यांच्या संपूर्ण मु‘यमंत्रिपदाच्या कार्यकाळात केवळ एक दिवस मंत्रालयात गेले याची खंत वाटते, असे मत व्यक्त केले होते. यावरूनच एक मु‘यमंत्री म्हणून, ठाकरेंची कार्यक्षमता काय होती हे दिसून येते असा टोलाही त्यांनी लगावला.

on - गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४,
Filed under - महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा