बीएसएफने उधळला बंगालमधील घुसखोरीचा डाव

– बांगलादेशाच्या सीमेवर तणाव,

कोलकाता, (०८ ऑगस्ट) – शेजारी राष्ट्र बांगलादेशातील अराजकतेचा आता भारतावर होऊ लागला आहे. सीमेवरून भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याचा एका मोठा गटाचा प्रयत्न सीमा सुरक्षा दल अर्थात् बीएसएफने उधळून लावला.
बीएसएफच्या अधिकार्‍यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या आंतरराष्ट्रीय सीमेवर बांगलादेशींच्या मोठ्या गटाचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. बीएसएफच्या कर्मचार्‍यांनी पूर्वेकडील राज्यातील अनेक ठिकाणांहून भारतीय बाजूने जाण्याचा प्रयत्न सुमारे १२०-१४० बांगलादेशी नागरिकांना रोखले. पश्चिम बंगालमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून भारतात घुसण्याचा त्यांचा प्रयत्न होता. दरम्यान, शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर बीएसएफ सतर्क झाले आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेवर कडेकोट बंदोबस्त
सीमा सुरक्षा दलाच्या अधिकार्‍यांना पश्चिम बंगालमधील भारत-बांगलादेश सीमेवरून बनावट भारतीय ओळख दस्तावेज वापरून बेकायदेशीर स्थलांतर करण्याच्या प्रयत्नांच्या शक्यतेबद्दल सतर्क आले होते. बांगलादेशी ग‘ामस्थांचा एक गट आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पोहोचला. यामुळे येथे थोडा गोंधळ झाला. परंतु, बीएसएफच्या जवानांनी तत्काळ कारवाई केली. शांततेने परिस्थिती सोडवली. भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असणार्‍यांना माघारी पाठवले. पश्चिम बंगालमधील उत्तर दिनाजपूर, दार्जिलिंग, जलपायगुडी आणि कूचबिहार जिल्ह्यांसह एकूण ४,०९६ किमी लांबीच्या भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय सीमेपैकी ९३२.३९ किमीची सुरक्षा करते.

✎ Edit

Posted by - Admin,
on - गुरुवार, ८ ऑगस्ट, २०२४,
Filed under - ,
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
Loading navigation...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

The Web Only VRITTABHARATI

हवामान

Subscribe Us

Subscribe Us for Latest Updates
Enter your email address:
ई-मेल करा व "वृत्ताभारती"चे सभासद व्हा.

FEATURED VIDEOS