पंतप्रधान मोदी आज करणार बिहार निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ
दरम्यान बिहार विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाने काल ७१ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. एनडीएचा आणखी एक मित्रपक्ष असलेल्या हिंदुस्तानी अवाम मोर्चा सेक्युलर या पक्षानेही ६ उमेदवारांची नावं जाहीर केली.
सीपीआय एम एल लिबरेशनने १८ उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. दरम्यान, महाआघाडीच्या घटक पक्षांमध्ये जागावाटपाबाबत बैठकांचं सत्र सुरू आहे, आज हे जागावाटप जाहीर होण्याची शक्यता आहे.
जनता दल युनायटेडनेही ५७ उमेदवारांची पहिली यादी आज जाहीर केली. अनेक विद्यमान आमदार आणि राज्यमंत्र्यांना जदयूने पुन्हा एकदा संधी दिली आहे. त्यात विजयकुमार चौधरी, श्रवण कुमार, मदन साहनी, सुनील कुमार यांचा समावेश आहे.
बिहारचे उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी आज लखीसराय मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. बिहारचे दुसरे उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता त्यांच्यासमवेत होते.

on - बुधवार, १५ ऑक्टोबर, २०२५,
Filed under - बिहार-झारखंड , राज्य
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा