पंतप्रधान उद्या आंध्र प्रदेशला भेट देणार
नवी दिल्ली (१५ ऑक्टोबर) - पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या आंध्र प्रदेशला भेट देणार आहेत. या दौऱ्यात ते नंद्याल जिल्ह्यातल्या श्रीशैलम इथल्या श्री भ्रमरम्बा मल्लिकार्जुन स्वामी देवस्थानम इथं पूजा करतील.
✎ Edit
ते श्रीशैलममधील श्री शिवाजी स्फूर्ती केंद्रालाही भेट देणार आहेत. तसंच प्रधानमंत्र्यांच्या हस्ते कुर्नूलमध्ये सुमारे १३ हजार ४३० कोटी रुपयांच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात येणार आहे. या दौऱ्यात एका जाहीर सभेला देखील पंतप्रधान संबोधित करणार आहेत.

on - बुधवार, १५ ऑक्टोबर, २०२५,
Filed under - आंध्र-तेलंगाना , राज्य
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा