फक्त मुलांना जन्म देऊन चालणार नाही; संस्कारही आवश्यक
-राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख शांताक्का यांचे विजयादशमी उत्सवात मार्गदर्शन,
वर्धा, ४ ऑक्टोबर - महिला प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. स्त्रीला काही देवदत्त वरदान आहेत. त्यामुळे त्या श्रेष्ठ आहेत. मातृत्वभाव ठेवत त्या प्रत्येक क्षेत्रात पुढे आहेत. माधवी लता यांच्या कर्तव्याचा उल्लेख करीत ऑपरेशन सिंदुरमध्येही दोन महिलांची भुमिका महत्त्चपूर्ण होती. मातृत्वभाव जागृत ठेवणे आवश्यक आहे. मुलांना जन्म देऊन होणार नाही तर त्यांच्यावर चांगले संस्कार करण्याची जबाबदारीही तुमचीच असल्याचे मार्गदर्शन राष्ट्र सेविका समितीच्या प्रमुख संचालिका वी. शांताक्का यांनी केले.
वर्धा नगर राष्ट्र सेविका समितीच्या वतीने आज शनिवार ४ रोजी स्थानिक रंजन सभागृह येथे आयोजित शस्त्रपूजन व विजयादशमी उत्सवात त्या प्रमुख उद्बोधन करताना बोलत होत्या. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दत्ता मेघे उच्च शिक्षा आणि अनुसंधान संस्था सावंगी येथील कुलसचिव डॉ. श्वेता काळे (पिसुळकर) उपस्थित होत्या तर व्यासपिठावर प्रांत कार्यवाहिका रोहिणी आठवले, नगर कार्यवाहिका अॅड. सुवर्णा काळे यांची उपस्थिती होती.
त्या पुढे म्हणाल्या की, सज्जन शक्ती संघटीत करून राष्ट्रसर्वतोपरी ही भावना निर्माण करण्यासाठी डॉ. हेडगेवार यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना केली. स्वत: एमबीबीएस डॉक्टर असताना त्यांनी स्वत:चे जीवन राष्ट्राला समर्पित केले. त्यांनी स्वत:च्या नव्हे तर राष्ट्राच्या आरोग्याची काळजी घेतली. व्यक्ती ते राष्ट्रनिर्माण असे अलौकीक कार्य १ तासाच्या संघ शाखेतून सहज होत असल्याचे त्या म्हणाल्या. कर्मठ स्वयंसेवक निर्माण झाले आहेत. स्वयंसेवकांचे कार्य निरंतर सुरू आहे. जिथे कमी तिथे स्वयंसेवक असल्याचे त्या म्हणाल्या. सर्व युद्धात प्रत्यक्ष रणभुमीत नव्हे पण सैनिकांना मदतकार्य केले. समाजात सकारात्मक बदल करण्यासाठी पंच परिवर्तनाची गरज त्यांनी व्यक्त केली.
भारताचे लक्ष जीवन दर्शनला बदलायचे आहे. विश्व कल्याणासोबतच आमचा भारत सशक्त होईल. पर्यावरण संरक्षण, कुटुंब संरक्षण आवश्यक झाले आहे. आज कुटुंबाची स्थिती काय याचे चिंतन आवश्यक आहे. आमच्या देशात सामाजिक समरसता होती. तेव्हाच सर्व समाजाला ऋषी स्थान दिले आहे. भारतात जातीला नव्हे तर ज्ञानाला महत्त्व दिले जात असल्याचे त्या म्हणाल्या. भाषणाने संरक्षण होणार नाही. ते व्यक्तिगत आचरणात आणावे लागेल. ते पुढच्या पिढीला शिकवावे लागेल. संस्कार कमी होत आहेत. त्यासाठी स्त्री योगदान देऊन शकतात म्हणूनच तिला नारायणी नमस्तुते म्हणतात. भारत स्वत:साठी नव्हे तर विश्वाच्या कल्याणासाठी सामर्थ्यशाली व्हावा, असे शांताका म्हणाल्या.
डॉ. श्वेता काळे पिसुळकर यांनी हा उत्सव राष्ट्रभतीचे प्रतिक आहे. येथुन सांस्कृतिक जागरण होते. येथील प्रेरणा अनुकरणीय आहे. शस्त्र कर्तव्य आणि सय्यमाचे प्रतिक आहे. आपण स्वत: महिला सशतीकरणात सहयोग देऊ असे आश्वासन दिले. संचालन, प्रास्ताविक व आभार प्रदर्शन सविता पराडकर यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा संघचालक जेठानंद राजपूत, नगर संघचालक डॉ. प्रसाद देशमुख यांच्यासह स्वयंसेवक व सेविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. सुरुवातीला वैयक्तिक गीत, सांघिक गीत, श्लोक आणि अमृत वचन झाले.

on - रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५,
Filed under - महाराष्ट्र
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा