सोनम वांगचुक पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात?
– लडाखचे डीजीपी एस.डी. सिंह जामवाल यांचा दावा,
लेह, १ ऑक्टोबर – लडाखचे डीजीपी एस.डी. सिंह जामवाल यांनी दावा केला आहे की तथाकथित पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांच्या संपर्कात होते. त्यांनी अलीकडे केंद्रशासित प्रदेशाला राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीसाठी उपोषण केले होते. त्यांना राष्ट्रीय सुरक्षा कायद्यानुसार अटक करण्यात आली असून जोधपूर सेंट्रल जेलमध्ये हलवण्यात आले आहे.
डीजीपी जामवाल यांनी सांगितले की वांगचुक पाकिस्तान आणि बांगलादेशमध्ये कार्यक्रमात सहभागी झाले होते आणि त्यांच्या निधीच्या स्रोतांची चौकशी सुरू आहे. सरकारने लडाखमधील अलीकडील अशांततेसाठी वांगचुक यांना जबाबदार धरले आहे. त्यांच्या भडकाऊ भाषणांमुळे हिंसाचार भडकला असून चार लोकांचा मृत्यू आणि ८० जखमी झाले आहेत.

on - रविवार, ५ ऑक्टोबर, २०२५,
Filed under - गुन्हे-न्याय , राष्ट्रीय
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा