दीर्घायुष्याची ७ मुलभूत तत्त्व जाणून घ्या!

लंडन, (२९ एप्रिल) – आपल्या राहनीमानात आणि आहार केलेले किरकोळ बदल तुम्हाला दीर्घायुष्य प्रदान करू शकतात, असे एका संशोधनातून पुढे आले आहे. या सात तत्त्वांचे पालन केले, तर तुम्हाला कर्करोग होण्याची शक्यता २० टक्क्यांनी कमी होईल. आतड्यांचे विकार होण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी तर हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता ४४ टक्के कमी असेल, असा दावा लंडनच्या इम्पिरिअल कॉलेजमध्ये झालेल्या या संशोधनातून करण्यात आला आहे. या संशोधनासाठी ३.८० लाख लोकांवर अभ्यास करण्यात आला.
व्यायाम आणि मद्यप्राशन यासाठीही यात काही नियम आहेत. या नियमांनुसार, जे आयुष्य जगतील त्यांना याचे चांगले परिणाम मिळतील, असे या संशोधनातून सांगण्यात आले आहे. हे नियम जागतिक कर्करोग संशोधन निधी आणि अमेरिकेच्या कर्करोग संस्थेने यापूर्वीच मान्य केले आहेत. ब्रिटीश शास्त्रज्ञांनी अनेक युरोपिय राष्ट्रांमध्ये सुद्धा यासंबंधीचा अभ्यास केला आणि त्यातून आणखी काही निष्कर्ष काढले आहेत. आता हे सात नियम काय आहेत, ते पहा : १) शरीराला हलक्यात हलके ठेवण्याचा प्रयत्न करा. पण, वजन एकदम कमी होऊ देऊ नका. २) प्रत्येक दिवशी शारीरिकदृष्ट्या किमान ३० मिनिटे श्रम करा. ३) ज्या आहारात फॅट्स आणि साखरेचे प्रमाण अधिक आहे आणि फायबरचे प्रमाण कमी आहे, असा आहार घेऊ नका. शीतपेये घेऊ नका. ४) प्रत्येक प्रकारचे धान्य, भाजी, फळे, दाळी आहारात ठेवा. ५) मांसाहार शक्यतोवर करू नका. करीत असाल तर एका आठवड्यात अर्धा किलोपेक्षा अधिक मांसाहार करू नका. ६) मद्यपान करीत असाल तर पुरुषांसाठी दोन आणि महिलांसाठी एकपेक्षा अधिक पेग घेऊ नका. ७) महिलांनी आपल्या तान्ह्या बाळाला सलग सहा महिने स्तनपान करावे. सोपे आहेत ना नियम. चला तर मग सारे मिळून पाळू या आणि दीर्घायुषी होऊ या!

on - मंगळवार, ३० एप्रिल, २०१३,
Filed under - आरोग्यवर्धिनी
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा