पिझ्झा, बर्गर खाल्ल्याने दरवर्षी ५.४० लाख व्यक्तींचा मृत्यू
जास्त सेवन केल्याने मृत्यू होण्याचा धोका ३४ टक्के आणि हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका २८ टक्क्यांपर्यंत वाढू शकतो. पिझ्झा, बर्गर, बेकरी उत्पादने सोबतच स्वयंपाकात वापरले जाणारे विविध प्रकारचे तेल, सॉस, जॅमसारख्या माध्यमातून मेद शरीरात जात असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले असल्याचे आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितले.
शरीराचे नुकसान
जागतिक स्तरावर दरवर्षी सुमारे पाच अब्ज नागरिकांना अपायकारक मेदामुळे हृदयविकाराच्या धोक्याला सामोरे जावे लागते. जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) प्रकाशित केलेल्या अहवालात पिझ्झा, बर्गर आदींच्या आहारी गेलेल्या नागरिकांना तीव‘ हृदयविकार, हृदयविकाराचा झटका तसेच मृत्यू होण्याचा धोका अधिक असतो. भारतातील ४.६ टक्के हृदयरोगाचे मृत्यू अति मेदाच्या सेवनासंबंधित असू शकतात, अशीही भीती आरोग्य मंत्री मांडविया यांनी व्यक्त केली.
डब्ल्यूएचओचे निरीक्षण
-प्रक्रियायुक्त खााद्यपदार्थांत एकूण चरबीच्या प्रमाणात मेद २ टक्क्यांपेक्षा कमी असावा.
-हायड्रोजनेटेड तेलांच्या वापरावर कठोर बंदी लागू करण्यात यावी.
-आपल्या पोटात जाणारा पिझ्झा अनेक आजारांना निमंत्रण देणारा.
-निरोगी राहायचे असल्यास जंक फूड टाळा.

on - सोमवार, १४ ऑगस्ट, २०२३,
Filed under - आरोग्यवर्धिनी , राष्ट्रीय
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा