सोशल मीडिया साईट्सवर पाकिस्तानात येणार बंदी
इस्लामाबाद, (०४ मार्च) – सोशल मीडिया साईट्सवरील व्हिडीओ आणि माहितीचा तरुणांवर नकारात्मक परिणाम होत आहे. या साईट्सवर पाकिस्तानमध्ये कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी सिनेटमध्ये ठराव आणण्याची मागणी सदस्यांनी केली आहे. विशेष असे की या सदस्यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया साईटचा उल्लेख करीत तातडीने बंदी आणण्यासाठी ठराव पारित करण्याची मागणी केली आहे.
पाकिस्तानात झालेल्या राष्ट्रीय निवडणुकांना उशीर झाल्याचा तसेच सोशल मीडिया साईटवर कायमस्वरूपी बंदी आणण्याचा ठराव मांडणार्या सिनेटर बहरामंद खान टांगी यांची नुकतीच पाकिस्तान पीपल्स पार्टीने (पीपीपी) पक्षातून हकालपट्टी केली होती. हा ठराव मांडताना त्यांनी सोशल मीडिया साईट्स समाजाची दिशाभूल करते तसेच तरुणांचे भविष्य धोक्यात आले असून त्यांच्यावर नकारात्मक प्रभाव होत असल्याचे म्हटले होते. दरम्यान सिनेट सदस्यांची मागणी लक्षात घेऊन सोशल मीडिया साईट्सवर कायमस्वरूपी बंदी घालण्याच्या ठरावावर सोमवारी चर्चा होणार आहे.
नकारात्मक प्रचाराचा आरोप
सोशल मीडिया साईट्सवर बंदी घालण्याची मागणी करताना सिनेटर टांगी यांनी म्हटले की धर्म आणि संस्कृतीचा अपप्रचार करण्यासाठी याचा वापर केला जात आहे. तसेच लोकांमध्ये द्बेष पसरविणारे भाष्य केले जाते. तसेच पाकिस्तानच्या सैन्यदलाविरोधात नकारात्मक प्रचार केला जातो, हा प्रकार देशहिताच्या विरोधात आहे. फेसबुक, टिकटॉक, इन्स्टाग‘ाम व एक्ससह इतर सोशल साईट्सवर बंदी घालण्याची मागणी सरकारकडे केली होती. निवडणुकीत घोळ झाल्याच्या आरोपानंतर पाकिस्तानात सोशल मीडिया साईटसवर प्रतिबंध लावण्यात आले होते.

on - सोमवार, ४ मार्च, २०२४,
Filed under - आंतरराष्ट्रीय , आशिया
You can follow any responses to this entry through the RSS 2.0
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा