डाळींच्या दरात वाढ, आता वरण महागणार!

मुंबई, (२३ मे) – डाळ ही अशी एक गोष्ट आहे, जी प्रत्येक भारतीयाच्या घरामध्ये दररोज शिजवली जाते. परंतु सध्या डाळींच्या वाढत्या किमती पाहता लवकरच ही डाळ स्वयंपाकघरातून गायब तर होणार नाही ना अशी चिंता आता व्यक्त केली जात आहे. खरे तर एप्रिल महिन्यापर्यंत डाळींच्या किमतींवर सरकारने नियंत्रण ठेवले होते. आता मे महिन्यामध्ये डाळींच्या किमतींमध्ये पुन्हा वाढ होत आहे. ग्राहक विभागाची आकडेवारी पाहता सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहणार नाही. जर अशीच या आकडेवारींमध्ये वाढ होत गेली तर स्वयंपाकघरातून डाळ नक्कीच गायब होईल.
ग्राहकविषयक विभागाच्या आकडेवारीनुसार, मे महिन्यामध्ये तुरीच्या डाळींची सरासरी किंमत ११६.६८ रुपये होती. आता १८ मे रोजी समोर आलेल्या आकडेवारीनुसार ही वाढून ११८.९८ रुपये इतकी झाली आहे. मध्यमवर्गीय लोकांना याचा सर्वात जास्त फटका बसेल. कारण त्यांचा महिन्याचा खर्च हा ठरलेला असतो. त्यामुळे महागाईमुळे त्यांचा हा खर्च बिघडण्याची शक्यता आहे.
आणखी कोणत्या डाळींच्या किमती वाढल्या?
मे महिन्यात फक्त तुरीच्या डाळीच्या किमतीत वाढ नाही झाली तर मूग डाळ, उडीद आणि चण्याच्या डाळीच्या किमतीत देखील वाढ झाली आहे. मूग डाळीच्या किमतीविषयी सांगायचे झाले तर, १८ मे दरम्यान डाळींच्या किमतीमध्ये १०७.२९ रुपये ते १०८.४१ रुपयांची वाढ झाली आहे. तर उडीद डाळीच्या किमतीत १०८.२३ रुपये ते १०९.४४ रुपयांची वाढ झाली आहे. चण्याच्या डाळीच्या किमतीत ७३.७१ रुपये ते ७४.२३ रुपयांची वाढ झाली आहे.
बियाणे खरेदी करतांना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी

अनेक व्यापारी आमच्याकडे चांगल्या प्रकारचे सोयाबिन बियाणे आहे, अशी जाहीरात समाज माध्यम व अन्य मार्गाने करत असून शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करत असताना बियाण्याची उगवनशक्ती तपासूनच बियाणे खरेदी करावे जेणेकरून आपली फसवणूक होणार नाही याची दक्षता घ्यावी.
सोयाबीनच्या हंगामामध्ये अनेक व्यापार्यांनी चांगल्या प्रकारची सोयाबिन खरेदी करून त्याची साठवणूक केली व आज ते सोयाबीन बियाणे म्हणून विकत आहेत .या सोयाबीनच्या बियाण्याची उगवणशक्ती तपासूनच शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करावे. उगवणशक्ती जर चांगली असेल तर बियाणे पेरणी करण्यास काही हरकत नाही, परंतु उगवणशक्ती कमी असल्यास बियाणे पेरण्यास अयोग्य आहे, याची काळजी शेतकऱ्यांनी घ्यावी. शेतकऱ्यांनी खते व बियाणे खरेदी करताना मान्यताप्राप्त दुकानांमधूनच खरेदी करावे जेणेकरून आपली फसगत होणार नाही याची काळजी घ्यावी.
हेड कॉन्स्टेबल आणि १०वी-१२वी उत्तीर्ण पदासाठी बंपर भरती
सशस्त्र सीमा बल यांनी जारी केलेल्या अधिकृत अधिसूचनेत पदांनुसार पात्रता निश्चित करण्यात आली आहे. या रिक्त पदावर उपनिरीक्षक पदासाठी अर्ज करण्यासाठी पदवीधर असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हेड कॉन्स्टेबलसाठी १०वी पास आणि सहाय्यक उपनिरीक्षकासाठी १२वी उत्तीर्ण अशी पात्रता मागितली आहे. ज्या उमेदवारांचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त आहे तेच या पदांसाठी अर्ज करू शकतात. पदांनुसार कमाल वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे. यामध्ये २३ ते ३० वर्षे वयोगटातील उमेदवार अर्ज करू शकतात. आपण रिक्त पदासाठी जारी केलेल्या अधिसूचनेमध्ये पात्रतेचे तपशील पाहू शकता. आरक्षणाच्या कक्षेत येणार्या उमेदवारांना या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क भरण्याची गरज नाही. सामान्य, ओबीसी आणि ईडब्लूएस श्रेणीतील उमेदवारांना शुल्क म्हणून १०० रुपये जमा करावे लागतील. शुल्क फक्त ऑनलाइन भरता येईल.
अर्ज कसा करावा?
या रिक्त पदासाठी अर्ज करण्यासाठी, उमेदवारांनी प्रथम अधिकृत वेबसाइट applyssb.com ला भेट दिली पाहिजे.
साइटवर जाताच, प्रथम ऑनलाइन अप्लिकेशनस च्या लिंकवर.
यानंतर नोंदणी विभागात जाऊन नोंदणी करा.
ईमेलवर प्राप्त झालेल्या मोबाइल क्रमांक किंवा नोंदणी क्रमांकाच्या मदतीने अर्ज प्रक्रिया पूर्ण करा.
अर्ज पूर्ण झाल्यानंतर प्रिंट घ्या.
ज्युनियर एनटीआरच्या ३०व्या चित्रपटाचे शूटिंग सुरू
एनटीआरच्या ३०व्या चित्रपट दिग्दर्शक कोरटाला शिवा बनवत आहेत. वडील आणि मुलाच्या अदम्य संघर्षाच्या कथेवर आधारित आहे. एनटीआर ३० एप्रिल २०२४ रोजी रिलीज होणार आहे. चित्रपटाचे शूटिंग पूर्ण केल्यानंतर, ज्युनियर एनटीआर केजीएफ दिग्दर्शक प्रशांत नील यांच्यासोबत ३१ व्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तसेच तो हृतिक रोशनसोबत स्पाय युनिव्हर्सच्या वॉर २ चित्रपटाचे शूटिंग करणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार आहे.
’शाकुंतलम’ हिट, पहिल्याच दिवशी केली ५ कोटींची कमाई!

मुंबई, (१५ एप्रिल) – अभिनेत्री समंथा रुथ प्रभूचा चित्रपट ’शाकुंतलम’ १४ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी या चित्रपटाने चांगलीच ओपनिंग केली आहे. समांथाच्या चाहत्यांना थिएटरमधून संमिश्र प्रतिक्रिया मिळाल्या आहेत. यासोबतच चित्रपटाचे पहिल्या दिवसाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही समोर आले आहे.
साउथ इंडस्ट्रीतील टॉप अभिनेत्री समंथा रुथ प्रभू आणि देव मोहन स्टारर या चित्रपटाचे दिग्दर्शन गुणशेखर यांनी केले आहे. शकुंतलम या चित्रपटाच्या शीर्षकावरूनच हा चित्रपट पौराणिक कथांशी संबंधित असल्याचे समजते. रिलीजपूर्वी समंथा अनेक कार्यक्रमांमध्ये त्याचे प्रमोशन करताना दिसली. अखेर काल हा चित्रपट प्रदर्शित झाला. बॉक्स ऑफिसबद्दल बोलायचे झाले तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने जवळपास ५ कोटींची कमाई केली आहे. हे आकडे अपेक्षेपेक्षा चांगले असल्याचे मानले जात आहे. आदल्या दिवशी समोर आलेल्या अंदाज अहवालात असा दावा करण्यात आला आहे की चित्रपट पहिल्या दिवशी ४ ते ४.५ कोटींची कमाई करू शकेल. परंतु प्रत्यक्षात मात्र पहिल्या दिवशीची कमाई या पेक्षा जास्त झाली आहे.
समंथा रुथ प्रभू आणि देव मोहन अभिनीत हा चित्रपट महाकवी कालिदासाच्या अभिज्ञानासकुंतलम या महाकाव्यावर आधारित आहे. या चित्रपटात अभिनेत्रीने महाराज दुष्यंत यांच्या पत्नी शकुंतलाची भूमिका साकारली आहे. दुर्वास ऋषींच्या शापामुळे ती प्रेमासाठी आसुसलेली आहे. ही अतिशय सुंदर पौराणिक कथा एखाद्या परीकथेसारखी पडद्यावर आणली आहे. हा चित्रपट आता प्रेक्षकांची मने जिंकण्यात यशस्वी होताना दिसत आहे.
लाल मिरचीचा भाव वधारला

गुंटूर, (१५ एप्रिल) – अवकाळी पाऊस, उत्पादन कमी, वाढलेली मागणी, लग्नसराई, निर्यातीत वाढ, गतवर्षी झालेली कमी साठवणूक आदी कारणाने लाल मिरची सध्या भाव वधारला आहे.
जिल्ह्यात लाल मिरचीचे उत्पादन नगण्य आहे. जिल्हावासीयांना पर प्रांतातील मिर्चीच्या आवकवर अवलंबून रहावे लागते. शहरातील बाजारपेठेत लाल मिरचीची आवक घटली आहे. जिल्ह्यात उन्हाळी कामांना सुरुवात झाल्याने घरगुतीसह कारखानदारांकडून मिरचीला मागणी आहे. त्यातुलनेत आवक नसल्याने मिरचीचे भाव उच्चांकी पातळीवर पोहोचले आहेत. किरकोळ बाजारात गेल्या वर्षीच्या तुलनेत लाल मिरचीची चढ्या भावाने विक्री होत आहे. गतवर्षी लहरी हवामानामुळे उत्पादनात घट होऊन मिरचीच्या साठवणुकीत मोठी घट झाली. स्थानिक बाजारपेठांमध्ये निर्यातीसाठी मोठ्या प्रमाणात मिरचीची खरेदी करण्यात येत आहे. त्याचा परिणाम शहरातील आवकवर झाला आहे. भारतामध्ये आंध्र प्रदेश व कर्नाटक राज्यांत सर्वाधिक लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते.
यंदाही अवकाळी पाऊस, गारपीट तसेच रोगाच्या प्रादुर्भावामुळे मिरचीच्या उत्पादनात घट झाली आहे. दरम्यान, गोदामातील साठा संपल्याने सध्या बाजारात नव्या हंगामातील मिरची दाखल होत आहे. यंदा गुजरात येथूनही मिरची बाजारात येत आहे. मात्र, त्याचेही भाव तेजीत आहेत. लाल मिरचीच्या भावात येत्या काळात मंदी येण्याची शक्यता नाही. ब्याडगी मिरचीच्या भावात गतवर्षीच्या तुलनेत दुपटीने वाढ झाली आहे. मार्च, एप्रिलमध्ये लग्नसराई सुरू होते. त्याचप्रमाणे घरगुती मसाला व उन्हाळी पदार्थ गृहिणी तयार करतात. त्यामुळेसुद्धा दरवर्षी उन्हाळ्यात भाव वाढतात. प्रमुख मिरची उत्पादक राज्य असलेल्या आंध्र प्रदेश, कर्नाटकमध्ये जोरदार अवकाळी झाल्याने पिकाचे नुकसान झाल्याने आवक कमी झाली. त्यामुळे भाव वाढलेले आहेत व कमी होण्याची शक्यता कमी असल्याचे एका व्यापार्याने सांगितले.
मिरची प्रकार प्रति किलो भाव
लवंगी २५० ते ३५०
ब्याडगी ६५० ते १०००
संकेश्वर २०० ते ३५०
गुंटूर २५० ते ३१५
भिवापूरी २८० ते ३००


